तुमचा उमेदवार जिंकल्यास ईव्हीएम बरोबर अन्… बावनकुळेंचा विरोधकांना चिमटा

तुमचा उमेदवार जिंकला तर ईव्हीएम (Evm) बरोबर अन् आमचा उमेदवार जिंकला तर ईव्हीएम मशीन चुकीचं का? या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना चिमटा काढलायं. दरम्यान, विरोधकांकडून कायमच निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीनबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतात, त्यावरुन विरोधकांना बावनकुळेंना चिमटा काढलायं. Sanjay Raut : बेईमान लोकांना जनतेनं कपडे काढून रस्त्यावर चोपलं पाहिजे बावनकुळे म्हणाले, ज्या […]

Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar

तुमचा उमेदवार जिंकला तर ईव्हीएम (Evm) बरोबर अन् आमचा उमेदवार जिंकला तर ईव्हीएम मशीन चुकीचं का? या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना चिमटा काढलायं. दरम्यान, विरोधकांकडून कायमच निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीनबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतात, त्यावरुन विरोधकांना बावनकुळेंना चिमटा काढलायं.

Sanjay Raut : बेईमान लोकांना जनतेनं कपडे काढून रस्त्यावर चोपलं पाहिजे

बावनकुळे म्हणाले, ज्या ईव्हीएम मशीनवर ठाकरे गटाचे आमदार निवडून आलेत, त्यांनी आता ठाकरेंना सोडलंय. सोडल्यानंतर ते ईव्हीएम मशीनवर बोट ठेवत असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या मतदारसंघात त्यांच्या मतांचा लीड किती होता ते विचारा? असंही ते म्हणाले आहेत.

पंचनामे युद्धपातळीवर करा, अयोध्येतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

कसब्यात काँग्रेसचा उमदेवार जिंकला तेव्हा तिथं ईव्हीएम मशीन नव्हती का? म्हणजे तुमचा उमेदवार जिंकला तर ईव्हीएम बरोबर आणि भाजपचा उमेदवार जिंकल्यास चुकीचं असं विरोधक समजत असल्याचं त्यांनी म्हंटलय.

एकनाथ शिंदे यांचे वागणे म्हणजे मूह में राम, बगल में छुरी; चंद्रकांत खैरेंचे टीकास्त्र

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही भाष्य केलं असून मुख्यमंत्र्यांचा हा दौरा एक महिन्यापूर्वीच ठरलेला होता. अयोध्या हा श्रद्धेचा विषय असून विरोधकांनी टीका करु नये, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार, अजित पवारांना श्रीरामाचं दर्शन घ्यायचं नसेल तर त्यांनी घेऊ नये, पण इतर नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका करु नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय. तसेच खासदार सुप्रिया सुळे देव दर्शन करतात तेव्हा आम्ही टीका करतो का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी टोला लगावलाय.

Exit mobile version