Sujay Vikhe On Operation Lotus : राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजातील अनियमित्ये विरोधात आज मुंबईमध्ये विरोधी पक्षांकडून ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येत आहे. यावरती बोलताना माजी खासदार सुजय विखे यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत या मोर्चाला हास्यास्पद म्हटले आहे. तसेच जेव्हा माझा पराभव झाला तेव्हाही मतदार यादी सारखीच होती मात्र आता विधानसभे वेळेस त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी मतदार यादीवर आक्षेप घेणे ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला माहिती असून हे उद्या जाऊन जर पराभूत झाले जे की ते होणारच आहे त्यासाठी ते आधीच असे कारण शोधून ठेवत आहे असा खोचक टोला माजी खासदार सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव होणार आहे. आपण पडणार आहोत त्यापूर्वीच विरोधकांनी आपले भाषण तयार करून ठेवलेले आहे त्यांचा आजचा मोर्चा ही गोष्ट सिद्ध करून जाते की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये त्यांचा पराभव हा त्यांना स्पष्टपणे दिसत आहे अस यावेळी सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले.
मी डॉक्टर माझ्या पद्धतीने ऑपरेशन करतो
राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस ची चर्चा होत आहे. यावरती बोलताना सुजय विखे म्हणाले अनेक लोक महायुतीतील विविध घटक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत करत आहे. महायुतींच्याद्वारे जनतेचा विकास होत आहे म्हणून लोकांचे प्रवेश होत आहे त्यामुळे यात गैर काही नाही. सुनिता बांगरे यांचा नुकताच प्रवेश झाला आहे तसेच अनेक बडे नेते देखील ऐच्छिक आहे असा गौप्यस्फोट देखील यावेळी सुजय विखे यांनी केला. तसेच आम्ही काँग्रेसमध्ये होतो आम्ही भाजपात आलो. मला जनतेने खासदार केलं राधाकृष्ण विखेंना देखील मंत्रीपद दिले गेलं त्यामुळे सक्षम लोक महायुतीमध्ये प्रवेश करतात यात गैर काही नाही असं देखील माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले.
आम्ही काँग्रेसचे लोक घेणार नाही
ऑपरेशन लोटस वरती बोलताना विके म्हणाले मी डॉक्टर असून ऑपरेशन मी माझ्या पद्धतीने करतो ऑपरेशन लोटस हा राजकीय शब्द आहे. माझे ऑपरेशन हे वेगळे असतात. ऑपरेशन लोटस अंतर्गत कोणत्याही पक्षाला आम्ही टार्गेट केलेले नाही. आम्ही काँग्रेसचे लोक घेणार नाही. कारण काँग्रेस हा संपलेला पक्ष असून त्यांना आमच्या सोबत घेऊन आम्हाला आमचा पक्ष संपवायचा नाही अशी आमची व्यक्तिगत भूमिका आहे असे यावेळी सुजय विखे म्हणाले.
आहिल्यानगर, मुंबई अन् नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास धो धो पाऊस; अलर्ट जारी
राज ठाकरे आघाडीमध्ये सहभागी झाल्याने महायुतीच्या जागा वाढणार
राज ठाकरे आघाडीमध्ये सहभागी झाल्याने महायुतीच्या जागा अधिक वाढतील अशा शब्दात विखे यांनी शाब्दिक चिमटा काढला. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाने काही वेगळे मुद्दे मांडून काही जनमतातून त्यांना काही मिळालं कारण जनतेने मनसेला यापूर्वी संधी दिली होती त्यांच्या माध्यमातून काम होत नाहीये जनतेला समजल्यानंतर जनतेने पुन्हा त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे ठाकरे एकत्र आले किंवा राज ठाकरे आघाडीत गेले त्यामुळे महायुतीचेच उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील असा विश्वास यावेळी सुजय विखे यांनी व्यक्त केला.
