Explosion in a mosque in Beed Ardhamsala : बीडमध्ये एका प्रार्थना स्थळावर स्फोट करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थना स्थळावर स्फोट करण्यात आला. (Beed) या स्फोटात प्रार्थनास्थळाची फरशी फुटल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात निलंबनाचं वादळ! सायबर शाखेचे PSI रंजीत कासले निलंबित; एका महिन्यात किती कारवाया?
बीडच्या अर्धामसला गावातील एका प्रार्थना स्थळावर माथेफिरूकडून स्फोट करण्यात आला. विहिरीमध्ये खोदकामासाठी आणलेल्या जिलेटीनच्या स्टिक्सचा वापर करत स्फोटाचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, वैयक्तिक भांडणातून माथेफिरूने स्फोट केला असून सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. तर प्रार्थनास्थळाची फरशी फुटली आहे. घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन जणांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती मिळाली आहे.
दोन जण ताब्यात
पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. हे दोन्ही तरुण शेतकरी असल्याचं सांगितलं जात आहे. ते माथेफिरू असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच विहिरीच्या खोदकामासाठीचे हे जिलेटिन होते, असंही सांगितलं जात आहे. पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना आणि दोन्ही समाजाला शांतात राखण्याचे आवाहन केलं आहे.
काय म्हणाले पोलीस अधीक्षक?
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत म्हणाले की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. तर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांनी शांतता बाळगावी, असं आवाहन देखील पोलीस अधीक्षकांनी केले आहे.