Fadnavis at Vikhe Patal’s house when there was no scheduled event : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निकालानंतर विरोधकांकडून सरकार कधीही कोसळू शकते, असे दावे केले जात आहेत. त्यामुळं, अनेक राजकीय समीकरणं चर्चेत येत आहेत. एक म्हणजे, अजित पवार हे भाजपसोबत जातील अन् सीएम पद पदरात पाडून घेतील. मात्र, भाजपसोबत जाणार नाही, असे सांगत त्यांनी या चर्चेला विराम दिला. दरम्यान, जर सरकार कोसळलं आणि पुन्हा संधी मिळाली तर अशावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सीएम पद मिळू शकते, अशा चर्चा आहेत. या चर्चेत तथ्य नसल्याचे आणि आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच असल्याचं विखेंनी यापूर्वीचं स्पष्ट केलं आहे. मात्र, रविवारी अहमदगनर दौऱ्यावर आलेले फडणवीस नियोजित कार्यक्रम नसतांना विखे पाटलांच्या घरी गेले. त्यांनी काही काळ विखे कुटुंबीयांसोबत घालवला. त्यामुळं जुन्या चर्चेला पुन्हा बळ आलं आहे.
सध्या जोडण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या राजकीय समीकणांमध्ये विखे पाटील हेच मुख्यमंत्री होणार, हे एक समीकरण मांडलं जातं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा आहे. त्यासाठी काही कारणेही दिली जातात. विखे पाटील हे कॉंग्रेसमधून भाजपात आले आहेत. इकडे भाजपच्या संस्कृतीत बऱ्यापैकी मिसळून त्यांनी राज्यातील आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशीत त्यांचे चांगले संबंध आहेत. विखे हे सहकारातील ते एक बडं नाप आहे. सहकार मंत्रालय स्थापन करण्यात अन् पहिली सहकार परिषदेचं आयोजन करण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता. महत्वाचं म्हणजे, सध्या आवश्यकता असल्याप्रमाणे त्यांचे सर्वच पक्षांमध्ये चांगले संबध आहेत. थेट शरद पवारांना भिडणारे विखे अशी विखेंची ओळख आहे.
कुणाल कामरांनी IT नियमांना दिलेले आव्हान योग्यच; खंडपीठाचा केंद्र सरकारला मोठा झटका
निवडणुकीला सामोरे जातांना एक मराठा चेहरा असावा, असे भाजपला वाटते. तशी मराठा समाजावर प्रभाव पाडेल, अशी विखेंची इमेज आहे. राज्याच्या राजकारणावर त्यांची पक्की पकड आहे. त्याचं उपद्रवमुल्य जास्त आहे. आणि अन्य काही समीकरणेही जुळत असल्याने सीएम पदासाठी विखे पाटील यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची राज्याचा राजकारणात चर्चा होती. मात्र, 2-3 दिवसांआधी दस्तुरखुद्द विखेंनी स्वत:च यावर आपलं स्पष्टीकरण दिले होते. असे काही नसून फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे विखेंनी सांगितलं होतं.
विखे पाटील यांच्या या स्पष्टीकरणानंतर ही चर्चा काहीशी कमी झाली. मात्र, रविवारी रात्री अचानक फडणवीस यांनी लोणी येथे जावून विखे-यांचा पाहूणचार घेतला. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते नगरच्या कुस्ती स्पर्धेहून थेट शिर्डी विमानतळावर जाणार होते. मात्र, त्यांनी मध्येच लोणी येथे थांबून विखे पाटील यांच्या कुटुंबासोबत काही वेळ घालवून पुढचा प्रवास केला. अर्थात ही कौटुंबिक भेट होती. सर्व सदस्यांना ते भेटले. सर्वांचा फोटोही काढला. मात्र, फडणवीस आणि विखे यांच्यातील संबंध याभेटीमुळं पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या भेटीचा संदर्भामुळं विखेंनी मुख्यमंत्री पद देण्यात येईल, या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. दरम्यान, तसं झालं तर अहमदनगर जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्री पद मिळेल.