Download App

रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली; मध्यरात्रीच उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं दाखल

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री उशीरा त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.

  • Written By: Last Updated:

Ravikant Tupkar admitted to MGM Hospital:अन्नत्याग आंदोलनामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे. (Ravikant Tupkar ) चार दिवस अन्नत्याग केल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे. यामुळं किडणीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सरसावले! पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. परंतु, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्चही निघत नाही आणि कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चाचा अर्धा भाव देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. याच कारणासाठी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळवण्यासाठी रविकांत तुपकर यांचं आंदोलन सुरु आहे. मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची शंभर टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशीही त्यांनी मागणी आहे.

तुपकर यांची स्थानिक उपविभागीय अधिकारी यांनी भेट घेतली होती. तसंचं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही तुपकर यांच्याशी फोन वरून बातचीत केली होती. आंदोलन थांबवून मुंबईला या ,आपण बैठकीत प्रश्न सोडवू असं आवाहन मुंडे यांनी केले होत. मात्र, तुपकर हे आपल्या आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर रात्री तुपकरांची तब्बेच बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Ganeshotsav 2024 : लाडक्या बाप्पाचं आगमन, राजकीय नेत्यांच्या घरीही गणराया विराजमान!

छत्रपती संभजीनगरच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या मागण्यांसदर्भात 11 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us