Download App

शेतकऱ्यांना दुबार पेरणी टाळता येणार; फडणवीसांनी मान्सूनच्या आगमापूर्वी आखला मास्टर प्लॅन

Devendra Fadnavis यांनी आज 21 मे रोजी फडणवीस यांनी खरीप हंगाम नियोजन बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली.

Farmers able to avoid double sowing Devendra Fadnavis drawn up master plan before monsoon : राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे मान्सून तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपुर्व मशागती सुरू आहेत. यातच जर समाधानकारक पाऊस आला नाही. तर अनेकदा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते.

नाबार्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला ३ लाख रुपये पगार, पात्रता काय?

मात्र यंदा ही दुबार पेरणी टाळता येणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सूनच्या आगमापूर्वी एक मास्टर प्लॅन आखला आहे. आज 21 मे रोजी फडणवीस यांनी खरीप हंगाम नियोजन बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यंदा हवामान विभागाने राज्यात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Cab Guidelines : अॅप्सद्वारे टॅक्सी बुक करण्याचे नियम झाले कडक! बुकिंग रद्द केल्यास मोठा दंड आकारला जाणार

तसेच यावर्षी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी दरवर्षी 5 हजार कोटींची गुंतवणूक ही शेती क्षेत्रात केली जाणार आहे. त्यासाठी 1 लाख 51 हजार शेतकऱ्यांना एक हजार कोटींच्या बजेटच्या त्यांच्या विविध मागण्या पुर्ण करण्याच्या यादीला मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता निधी असेल तसं जो पहिला येईल तो लाभार्थी. या तत्त्वावर आम्ही शेतकऱ्यांसाठी आणलेल्या अधिकृत अॅपवर ते जशी मागणी करतील. त्या हिशेबाने त्यांना त्या वस्तू देऊ.

चीनचा रडीचा डाव! व्यापारात भारताला खराब वस्तूंचा पुरवठा; भारतानेही घेतला ‘हा’ निर्णय

त्याचबरोबर शेतकऱ्यांवर कधी पाऊस न आल्याने किंवा अतिवृष्टी झाल्याने जी काही दुबार पेरणी करण्याची वेळ येते किंवा उभी पीक नुकसानग्रस्त होतात. त्याची अगोदर पुर्वसूचना कशी देता येईल. याचा प्रयत्न आम्ही आयएमडीच्या मदतीने करणार आहोत. त्यासाठी आम्ही एक यंत्रणा देखील तयार केली आहे. असं म्हणत फडणवीसांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

follow us