farmers will get compensation if Birds damage fruits and grains decision of High Court : मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण न्यायालयाने एका प्रकरणामध्ये असा निर्णय दिला आहे की, जर शेतकरी किंवा नागरिकांच्या फळ- झाडं आणि पिकांचं पशुपक्षांनी नुकसान केल्यास संबंधितांना नुकसान भरपाई दिली जावी.
नेमकं प्रकरण काय?
वर्धा जिल्ह्यातील हिंगी गावातील शेतकरी महादेव डेकाटे या 70 वर्षीय शेतकऱ्याने याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये मे 2016 मध्ये त्यांच्या शेतातील डाळींबाच्या झाडावरील डाळींबाच्या पोपटांनी फळांना चोचा मारल्या. त्यात त्यांच्या 200 झाडांची फळांना ह्या चोचा मारल्या गेल्या. त्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. हे पोपट जंगली पोपट होते. त्यामुळे आपल्याला सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली होती.
त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यामुर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि निवेदिता मेहता यांच्या पीठाने सुनावणी दिली. ज्यामध्ये त्यांनी पक्षी वन्यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार जर शेतकरी किंवा नागरिकांच्या फळ- झाडं आणि पिकांचं पशुपक्षांनी नुकसान केल्यास संबंधितांना सरकारकडून नुकसान भरपाई दिली जावी. असा निर्णय देण्यात आला आहे.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांविना पद्म पुरस्कार समितीची घोषणा; जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नवी रचना
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले आहेत की, महादेव डेकाटे यांच्या २०० झाडांच्या नुकसानीसाठी प्रत्येक झाडामागे २०० रुपये याप्रमाणे भरपाई देण्यात यावी, 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शेतकऱ्याचा हा विजय राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठीही आशेचा किरण ठरला असून या निर्णयाची चांगलीच चर्चा शेतकरी वर्गात रंगली आहे.
