Download App

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य, अन्यथा…

FAST tag mandatory from 1 April 2025 : महाराष्ट्र सरकारने (Fadanvis Goverment Decision) 1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व वाहनांसाठी फास्टटॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने आज 7 डिसेंबर रोजी हा निर्णय घेतला. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवरून जाणाऱ्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांसह सर्व वाहनांना हे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे वाहतूक (FAST tag) कोंडी कमी होण्यास मदत होईल, कॅशलेस व्यवहारांना चालना मिळेल आणि एकूण कार्यक्षमता वाढेल, असा यामागे उद्देश आहे.

राज्यातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे.

देश सोडून पळून गेलेल्या दहशतवाद्यांच्या ‘भारतपोल’ आवळणार मुसक्या; जाणून घ्या कसं?

फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरा.यचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल
एमएसआरडीसीच्या अखत्यारीत 50 टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात 23 टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

मंत्रिमंडळ निर्णयानुसार शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण-2014 मध्ये सुधारणा करणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य करण्यात आलाय. शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी बदल करत आहेत. महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा करणार असल्याचं समोर आलंय

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्राम लाँच केलाय. तो RFID तंत्रज्ञानावर आधारित FASTag द्वारे वापरकर्ता शुल्क गोळा करतो. हे इंधन, वेळ आणि प्रदूषण वाचवण्यासाठी आणि अखंडित रहदारीची खात्री करण्यासाठी केले गेले. 1 डिसेंबर 2019 पर्यंत फी प्लाझातील सर्व लेन ‘फास्टॅग लेन ऑफ फी प्लाझ’ म्हणून घोषित केल्या जातील असा निर्णय घेण्यात आला. NHAI ने सर्व शुल्क प्लाझा इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीने सुसज्ज केले आहेत.

FASTag ची उपलब्धता सुलभ करण्यासाठी, NHAI ने MyFASTag APP लाँच केले. ज्यामधून POS चे स्थान आणि NHAI/इतर वॉलेट किंवा बँक खात्यांशी शुल्क आकारणे/लिंक करणे यासह FASTag बद्दल सर्व माहिती मिळू शकते. फास्ट टॅगचा वापर टोल प्लाझावर अखंड प्रवास आणि व्यवहारांसाठी केला जातो. फास्ट टॅगच्या अंमलबजावणीमुळे टोल नाक्यावरील प्रतिक्षेचा वेळ कमी होतो. हे ऑटो-नूतनीकरण वैशिष्ट्यासह येते.

देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे की बीडचं…संजय राऊत यांचा देशमुख हत्येवरून घणाघात

गोंधळ टाळण्यासाठी आणि अचूक टोल वसुली सुनिश्चित करण्यासाठी प्रति वाहन फक्त एक FASTag ला परवानगी आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो, तर फास्टॅग असलेल्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. FASTags च्या अंमलबजावणीमुळे प्रवास जलद आणि सुरळीत होतो.

 

follow us

संबंधित बातम्या