तुम्ही फडणवीसांच्या टीमचे कॅप्टन, असं म्हणताच उदयनराजे म्हणाले ‘नाही रे बाबा…’अन् पिकला एकच हशा

तुम्ही फडणवीसांच्या टीमचे कॅप्टन, असं म्हणताच उदयनराजे म्हणाले ‘नाही रे बाबा…’अन् पिकला एकच हशा

Shivendraraje Bhosale Meet MP Udayanraje Bhosale : मंत्रीपद मिळाल्यानंतर आज शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, प्रत्येकाला संधी मिळावी. त्यामुळे शिवेंद्रराजेंना का मिळू नये? नाही मिळाली तरी मला वेदना होणार आहे. परंतु प्रत्येकाला एक-एक संधी मिळावी, असं मला वाटतं. उदयनराजे भोसले त्यांच्या मिश्कील स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता देखील त्यांना पत्रकार बांधवांनी देवेंद्रजींच्या टीमचे कॅप्टन तुम्ही आहात, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उदयनराजे भोसले म्हणाले की, ऐ बाबा तसलं काही काढू नको.

बावनकुळेंना रामटेक बंगला, कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक, वाचा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला?

यावेळी शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, कराडच्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की टीमचे मालक ते आहेत. यावर उदयनाराजे म्हणाले की, थोडं फार कॅप्टनचं ऐकलं पाहिजे ना. मी मालक-बिलक नाही. विधानसभेत मंत्री केलं आता पुढचं (पालकमंत्रिपदाचं) काय असं म्हणताच उदयनराजे म्हणाले, अरे सगळ्या गोष्टी सांगायच्या (Maharashtra Politics) नसतात. काही समजून घ्यायच्या असतात. यानंतर तिथे एकच हशा पिकला. जो माणूस सर्वांना सोबत घेवून जातो, अशा व्यक्तीच्या हाती खुर्ची जावी असं देखील उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलंय. तसंच पुन्हा मिश्किलवार म्हणाले की, जायच्या अगोदर बाबांनी त्यांच्या गाडीचा सायरन लावला नाही, तर मग त्यांची गाडी जावू देणार नाही असं देखील उदयनराजे म्हणाले आहेत.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

राज्याच्या मंत्रिमंडळात सातारच्या राजघराण्यातील श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळाल्यानंतर त्यांनी आज आपले थोरले बंधू खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आपला धाकटा भाऊ मंत्री झाला असून आपल्याला खूप आनंद झाला आहे असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना शुभ आशीर्वाद दिले, तर सातारचे पालकमंत्री पद देखील माझे बंधू मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळेल अशी अपेक्षा या वेळेला बोलताना व्यक्त केली.

यावेळी बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील उदयनराजेंबाबत वक्तव्य केलंय. त्यांनीच माझ्या मंत्रि‍पदासाठी भूमिका घेतली होती, असं देखील शिवेंद्रराजे म्हणाले आहेत. त्यानंतर उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद निर्माण झालीय.लोकसभा निवडणुकीपासून चित्र बदलत गेलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा निवडून आल्यात. उदयनराजेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगलं काम करू, असं वक्तव्य देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube