Shivendraraje Bhosale : औरंगजेबाचे फोटो लावणाऱ्यांवर देशद्रोह दाखल करा, शिवेंद्रराजेंची मागणी

Shivendraraje Bhosale : औरंगजेबाचे फोटो लावणाऱ्यांवर देशद्रोह दाखल करा, शिवेंद्रराजेंची मागणी

Shivendraraje Bhosale on Aurangjeb Poster  :  छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) येथे औरंगाबादचे नाव बदलल्या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसांपूर्वी या आंदोलनस्थळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावले होते. यावरुन आता आमदार व छत्रपती घराण्याचे वंशज शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale )  यांनी सडकून टीका केली आहे. ज्यांनी कोणी औरंगजेबाचे फोटो लावले असतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

औरंगजेबाने त्याच्या कारकिर्दीमध्ये लाखो हिंदू लोकांची कत्तल केली आहे. अनेक हिंदू मंदिरे तोडली. अशा प्रकारे जर कोणी औरंगजेबाचे पोस्टर लावून त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचा निषेध करतो. ज्यांनी कोणी याठिकाणी औरंगजेबाचे फोटो लावले असतील त्यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतो, असे ते म्हणाले आहेत.

Ambadas Danve : इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द करा! दानवेंनी मागणी, नामांतराचा वाद पेटणार?

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे राज्याचे नाही तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी देसभर औरंगजेबाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढा उभारला. त्यामुळे ज्या कोणी औरंगजेबाचे फोटो लावले असतील त्यांनी राज्य सोडून इतरत्र निघून जावे, अशा शब्दात त्यांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाही, असे ते म्हणाले आहेत.

शरद पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा पाणउतारा; म्हणाले, ‘शहाण्या माणसाबद्दल विचारा…’

दरम्यान या प्रकरणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. इम्तियाज जलील हे औरंगजेबचा उदोउदो करतात. त्याचं उदात्तीकरण करतात. औरंगजेब हा देशद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही होता. देशद्रोही औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे, असे दानवे म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube