Shivendraraje-Udayanraje यांच्यातील संघर्ष टोकाला; सातार्‍यात ऑक्सिजन पण उदयनराजेंमुळेच येतो

Shivendraraje-Udayanraje यांच्यातील संघर्ष टोकाला; सातार्‍यात ऑक्सिजन पण उदयनराजेंमुळेच येतो

सातारा: भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) यांच्यातील संघर्ष सातारकारांना (Satara) नवीन नाही. आता डीपीडीसी निधीतील कामांच्या श्रेयावरुन दोघांमध्ये वाद पेटला आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली आहे.’नशीब सातार्‍यात ऑक्सिजन पण उदयनराजेंमुळेच येतोय हे अजून ऐकायला मिळाले नाही, एवढेच आपले नशीब समजायचे.’ अशी उपहासात्मक टीका भाजपचे (BJP) आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलीय.


‘साताराच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना नगरोत्थानमधून निधी वाढवून मिळावा. जास्त कामे व्हावीत, अशी माझी भूमिका आहे. श्रेयाचा विषयच नाही, ही कामे माझीच आहेत.

मी स्वतः बैठकीला होतो, माझ्या सह्या असून कामे मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सातारकरांना माहित आहे की कामांचे श्रेय कोण घेत आहे. सुरुची या निवासस्थानी प्रसार माध्यमांशी ते बोलताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे भोसलेंवर टीकेची झोड उठवली.

‘श्रेय कोण घेते हे सातारकरांना माहित आहे. नशीब ऑक्सिजन पण उदयनराजेमुळेच येतोय हे सातार्‍यात अजून ऐकायला मिळाले नाही एवढेच आपले नशीब आहे.

फॅशन आहे कि सातार्‍यात नाही तर जिल्ह्यात एखादे मोठे काम आले की ते मीच केले आणि जर कुठली कामे झाली नाहीत तर ते लोकप्रतिनिधी निष्क्रीय असून ती कामे करत नाहीत हा त्यांचा ठरलेला डॉयलॉग आहे.’ अशी टीकाही शिवेंद्रराजेंनी यावेळी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube