भुजबळांसाठी अजितदादांचा मास्टर प्लॅन ; फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

भुजबळांसाठी अजितदादांचा मास्टर प्लॅन ; फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

CM Devendra Fadanvis Reaction On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नव्या सरकारमध्ये कोणतही मंत्रिपद मिळालेलं नाही. यामुळे छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. त्यानंतर भुजबळांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच हल्लाबोल केलाय. त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. त्यांच्यात तब्बल 40 मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलंय. या भेटीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा छगन भुजबळ यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याच्या तयारीत असल्याचा मोठा खुलासा फडणवीसांनी केलाय.

राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

भुजबळांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा हेतू उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. फडणवीस म्हणाले की, भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे प्रमुख नेते (Maharashtra Politics) आहेत. तिन्ही पक्षांच्या मनात छगन भुजबळ यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयात त्यांचा देखील एक महत्वाचा वाटा राहिलेला आहे. स्वत: अजित पवार छगन भुजबळ यांची चिंता करतात.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुळातच भुजबळ साहेबांना अजितदादांनी मंत्रिमंडळात घेतलं नाही. तेव्हा त्यांना डावलण्याचा हेतू अजितदादांचा नव्हता. अजितदादा म्हणाले की, आमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर मोठा राहिलेला आहे. भुजबळांसारखा नेता ज्यांना देशाच्या अन्य राज्यांत देखील मान्यता आहे. त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे. त्यांचं मत थोडं वेगळं होतं. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय. आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू. भुजबळांसारखा नेता आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे, यादृष्टीने मार्ग काढू असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

आज मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या भेटीमध्ये काय चर्चा झाली, यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील सध्याची स्थिती आणि मागण्यासंदर्भात सर्वकाही सांगितलं आहे. ते पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये निर्णय घेणार आहेत. महायुतीचा महाविजय झाला असून या विजयात ओबीसी समाजाचं पाठबळ मोठ्या प्रमाणात लाभलं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी देखील असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सामाजिक अन् राजकीय मुद्द्यांवर फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube