BJP MLA Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विरोधात आमरण उपोषण

मुंबई : आष्टी तालुक्यातील कथित हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील राम खाडे (Ram Khade) नामक व्यक्तीने मुंबईत आमरण उपोषण सुरु केले आहे. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना अटक करून चौकशी करावी अशी मागणी खाडे यांनी केली आहे. मागण्या मान्य […]

Untitled Design (46)

Untitled Design (46)

मुंबई : आष्टी तालुक्यातील कथित हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील राम खाडे (Ram Khade) नामक व्यक्तीने मुंबईत आमरण उपोषण सुरु केले आहे. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना अटक करून चौकशी करावी अशी मागणी खाडे यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरु ठेवण्याचा इशारा यावेळी खाडे यांनी दिला आहे.
YouTube video player
सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी बीड जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणाबाबत गेल्या तीन वर्षांपासून मी लढा देत आहे. याबाबत खाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने १८ ऑक्टोबर रोजी राम खाडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

या प्रकरणातील संबंधितांना सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने देखील हाय कोर्टाचा निर्णय कायम ठेवला. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असताना देखील अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आहे.

या प्रकरणातील आरोप आमदार धस यांच्यावर कारवाई करून त्यांची बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी खाडे यांनी यावेळी केली आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस करवाई केली जात नसल्याने गेल्या चार दिवसांपासून मुंबईमधील आझाद मैदानावर सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

मात्र शासनाचा कोणी अधिकारी देखील अद्याप उपोषणस्थळी फिरकला नाही. हे भ्रष्टाचारी सरकार आहे. हिंदू देवस्थानाच्या जमिनी चोरणाऱ्याला हे सरकार संरक्षण देतेय का असा सवाल देखील खाडे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान यावर आता सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version