Fatal accident in Mumbai’s Coastal Road tunnel; One car catches fire, traffic completely disrupted:मुंबईतील कोस्टल रोडच्या (Coastal Road) बोगद्यात आज दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी (15 जुलै) एका चालत्या कारने पेट घेतला. कारने अचानक पेट घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बोगद्यात धूर पसरल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने तेथील वाहतूक थांबवली. त्यामुळे कोस्टल रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या असून, प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रवादी पुन्हा एकत्र? खासदार सुनील तटकरे अन् प्रफुल पटेल भेटीवर काय म्हणाले जयंत पाटील
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने कारला लागलेली आग विझवण्याचे काम हाती घेतले असून, तेथील परिसर सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धुरामुळे बोगद्यातील दृश्यमानता कमी झाल्याने वाहनचालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
“पुढील दोन दिवसांत सोनम वांगचूक यांचा जीव जाऊ शकतो” हायकोर्टात केली वैद्यकीय मदतीची याचिका दाखल!
दरम्यान पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. बोगद्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, जळालेली कार हटवून सुरक्षिततेची खातरजमा केल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
