Download App

Video : कोर्टाने स्पष्ट केलंय, मी कोणालाही फोटो पाठवले नाही; गंभीर आरोपांवर गोरेंचं स्पष्टीकरण अन् थेट इशारा

Jaykumar Gore : नुकतंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने धनंजय देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर कृषिमंत्री

  • Written By: Last Updated:

Jaykumar Gore : नुकतंच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर आता आणखी एक महायुती सरकारमधील मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला सेंड केले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या आरोपांवर आता मंत्री गोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

माध्यमांशी बोलताना मंत्री गोरे म्हणाले की, 2017 साली माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. विधानपरिषदेची निवडणूक झाली त्यानंतर पालिकेची निवडणूक होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आगोदर माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. 2019 मध्ये निकाल लागला. निकालामध्ये कोर्टने मला निर्दोष मुक्त केलं होता तसेच जप्त केलेला मुद्देमाल आणि मोबाईल नष्ट करण्याचे आदेश कोर्टाने मला दिले होते.

या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वोच्च न्यायालय आहे आणि माझी न्यायालयाने मुक्तता केली आहे. आज सहा वर्षांनंतर हा विषय समोर आला आहे. या संदर्भात ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे त्यांच्याविरोधात आजच हक्कभंगाचा प्रस्ताव मी सभागृहात आणणार आहे. तसेच त्यांच्या विरोधात बदनामीचा खटलाही दाखल करणार असल्याची माहिती मंत्री गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

याबाबत पुढे बोलताना मंत्री गोरे म्हणाले की, ज्यांनी आरोप केले आहे त्यांच्या विरोधात बदनामीच खटला दाखल करणार आहे आणि त्यांना कोर्टात खेचणार आहे. तसेच मी त्या महिलेला त्रास देत नाही. याबाबत पोलिसांनी चौकशी करावी. असं देखील मंत्री गोरे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचे महिलेने म्हटलं आहे. तर आपल्याला त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असेही त्या पत्रात सांगितलं आहे. तर होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे.

अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर गोरे यांना दहा दिवसांची जेलमध्येही जाव लागलं असं या पत्रातून सांगितले आहे.

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

दरम्यान, या प्रकरणात त्रास वाढतच गेल्याने बदनामी विरोधात ती महिला जिल्हाधिकाऱ्यांना भेटली होती. तसेच कारवाईची मागणी केली. मात्र कारवाई ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षकांकडे बोट दाखवण्यात आले होते, असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

follow us