Ahilyanagar Burud Gali Fire : अहिल्यानगर शहरातील बुरुड गल्ली परिसरात आज (2 डिसेंबर) सकाळी 6.30 च्या सुमारास अचानक एका गोदामाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुरुड गल्ली परिसरात असणारे आनंद चंगेडिया यांच्या मालकीच्या A S मार्केटिंगचे गोदाम या आगीत जळून खाक झाले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या आगीत कॅडबरी व किरकोळ मालाचा मोठा साठा पेटल्याने आगीने विक्राळ रूप घेतले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या आगीबद्दल माहिती मिळताच अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) आग्निशमन दलाने (Ahilyanagar Burud Gali Fire) तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली मात्र आतापर्यंत आगीचा कारण समोर आलेला नाही. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.
धनुभाऊ तुमची लायकी आहे का? तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता; आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबळजनक दावा
