Download App

नागरिकांनो सावधान! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण कोकणात, आरोग्य यंत्रणा सतर्क

  • Written By: Last Updated:

Corona virus Updates : कोरोना व्हायरसन (Corona virus) पुन्हा एकदा जगाची धाकधुक वाढवली आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाचा JN.1 या व्हेरियंटने आता राज्यातही शिरकाव केला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात JN.1 या प्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. सिंधुदुर्गातील एका 41 वर्षीय व्यक्तीला या प्रकाराची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य विभागाने (State Department of Health) कोरोना चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

Mla Disqualification : मॅरेथॉन सुनावणी संपली! शिंदे-ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण, निर्णयाची प्रतिक्षा 

जेएन-१ या व्हेरियंटमुळं गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ झाली. अमेरिका, सिंगापूर, चीन आणि काही युरोपीय देशांमध्ये या उपप्रकारांमुळे अनेक रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर आता देशात जेएन१ या व्हेरियंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. हा रुग्ण एक 79 वर्षीय महिला असून ती पूर्णपणे बरी झाली आहे. यानंतर या उपप्रकाराचे काही रुग्ण गोव्यात तर एक रुग्ण आतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला आहे.

‘हिरे उद्योग सुरतला’फडणवीसांनी खरं काय ते सांगून टाकलं; म्हणाले, ‘ही माहिती..,’ 

हा नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना सदृश लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणात आढळलेल्या रुग्णांना कोविड चाचणी करण्यास सांगितले आहे आणि सर्व जिल्ह्यांना कोविड चाचणी वाढविण्यास सांगितले आहे. इन्फुएन्झा आणि सारीचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

बुधवारी राज्यात 14 कोरोना रुग्ण आढळून आले असून, कोरोनामुळे एकाही मृत्यूची बातमी नाही. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 45 आहे. यावर्षी 134 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सरणीकर यांनी सांगिलते की, JN1 हा Omicron चा नवा व्हेरियंट आहे. JN1 ची लागण झाल्यास रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. या नव्या व्हेरियंटची लागण होऊ नये, यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आवश्यक तेथे मास्क वापरावे, हात वारंवार धुवावेत आणि इतर उपायांचे पालन करावे.

राज्यात काय परिस्थिती आहे?

सध्या राज्यात कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या राज्यात 23 हजार 295 खाटा आहेत. 33 हजार 404 ऑक्सिजन बेड आहेत. आयसीयू बेडची संख्या 9 हजार 521 आहे. 6 हजार 300 व्हेंटिलेटर बेड आहेत. यासह राज्यात एकूण 23 हजार 701 डॉक्टर उपलब्ध आहेत.

Tags

follow us