Five peoples Dead in Road Accident : राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालंल आहे. यामध्ये आता रत्नागिरी-नागपूर या महामारर्गावर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांपैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरजच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अल्पवयीन मुलं केक कापतानाच पोलिसांनी त्यांना ‘धू धू धुतले’… पुण्यात घडला प्रकार
हा अपघात रत्नागिरी-नागपूर या महामारर्गावर आज सकाळी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याजवळच्या वड्डी या गावाजवळ झाला. यामध्ये मृतांमध्ये 1 महिला, 3 पुरुष आणि एका 12 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. हे भाविक कोल्हापूरवरून पंढरपूरला जात होते. ते मुळचे राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावातील राहिवाशी आहेत. तर मृतांमध्ये सोहम पवार (१२), जयवंत पवार (४५), कोमल शिंदे (६०) आणि लखन शिंदे (६०) यांचा समावेश आहे.
तुमच्या Facebook Account हून आपोआप रिक्वेस्ट पाठवल्या जाताय, कंपनीचा अलर्ट नक्की पाहा
हा अपघात झाला कारण कोल्हापूरवरून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरोला यावेळी चुकीच्या बाजूने असणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली. यामध्ये बोलेरोचा चक्काचूर झाला. त्यामुळे घटनास्थळी मदतीवेळी मृतदेहांना बाहेर काढतानाचं विदारक चित्र पाहायला मिळालं.