तुमच्या Facebook Account हून आपोआप रिक्वेस्ट पाठवल्या जाताय, कंपनीचा अलर्ट नक्की पाहा

तुमच्या Facebook Account हून आपोआप रिक्वेस्ट पाठवल्या जाताय, कंपनीचा अलर्ट नक्की पाहा

Auto Friend Request from Facebook Accounts : गेल्या काही दिवसांपासून फेसबुक या सोशल मिडाया प्लॅटफॉर्मवर युझर्सना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. कदाचित तुम्हालाही ही समस्या उद्भवली असणार. कारण अनेक युझर्सच्या फेसबुक अकाऊंटवर अनेक अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत. तसेच अकाऊंटवरून इतरांना आपोआप फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जात आहेत.

CM शिंदेंनी ऐकली अभिनेत्रीची आर्त हाक; राधिका देशपांडेच्या मदतीला धावले प्रशासन

ही समस्या आल्यानंतर अनेक युझर्सने कंपनीकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र त्यानंतर देखील ही समस्या थांबलेली नव्हती. मात्र आता हा एक मोठा बग असल्याचं फेसबुक या कंपनीने सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार समोर आला होता. मात्र आता ही खरचं समस्या असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

Nikita Gokhale Braless Video: मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; कामयानी बांधा आणि मादक अदांनी वेधलं लक्ष

फेसबुकने या बग संदर्भात आपल्या युझर्सनाही नोटिफिकेशन पाठवलं आहे. फेसबुकने या अलर्टमध्ये सांगितलं की, ‘आम्ही नुकतचं एक बग दूर केला आहे. त्यामुळे काही युझर्सच्या फेसबुक अकाऊंटवर अनेक अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येत होत्या. तसेच अकाऊंटवरून इतरांना आपोआप फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जात होत्या. आम्ही याबद्दल माफी मागतो. तसेच या बगमुळे पाठवण्यात आलेल्या सर्व फ्रेंड रिक्वेस्ट रद्द करण्यात आल्या आहेत.

Shinde VS Thackeray : ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीपूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का

फेसबुकने या अलर्टसोबत युझर्सना आपली अॅक्टिव्हिटी लॉग चेक करायला सांगितलं आहे. फ्रेंड रिक्वेस्टची लिस्टही चेक करा तसेच सर्व नोटीफिकेशनही चेक करणे गरजेचे असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube