Shinde VS Thackeray : ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीपूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का

Shinde VS Thackeray : ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीपूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का

Thackeray group mahesh pasalkar entered in shivsena : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आज (ता17 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे ठाकरे गटाचे दुसरे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी देखील ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतरचा हा दुसरा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला आहे.

Trimbakeshwar Temple : ‘ते’ पत्र बळजबरीने लिहून घेतले; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर मोठा आरोप

उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. मात्र, बैठकीपूर्वीच पुणे जिल्हाप्रमुखांनी राजीनामा देत ठाकरे गटाला धक्का दिला आहे. आधीच पुणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी आहे. आणि त्यातही ठाकरे यांना आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे आणि विजय शिवतारे यांच्या सारख्या दिग्गजांनी साथ सोडल्याने काही मोजक्याच नेत्यांवर ठाकरेंची मदार होती. मात्र, तेही आता शिंदेंच्या गळाला लागत असल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.

प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून NIA ने तपास करावा..अन्यथा कायदेशीर लढाई

काही दिवसांपूर्वीच पक्ष नेतृत्वावर आरोप करत बाळासाहेब चांदेरे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबईत प्रवेश केला होता. आता त्यापाठोपाठ दुसऱ्याही जिल्हा अध्यक्षाने पक्ष नेतृत्वाने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करत राजीनामा दिला आहे.

ठाकरे गटाचा आक्रमक चेहरा म्हणून महेश पासलकर यांच्याकडे पाहिले जात होते. बाळासाहेब चांदेरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पासलकरांवर जिल्ह्याची मोठी जबाबदारी होती. पासलकर हे वीर बाजी पासलकर ग्रामीण विकास केंद्राचे अध्यक्ष असून त्यांचा दौंड तालुक्यात मोठा प्रभाव आहे. मात्र, त्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Rohit Pawar: रोहित पवार यांनी लाँच केलेलं रॅप साँग तरुणाईच्या ओठांवर

पासलकर हे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटांच्या पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे बोललं जात होतं. मात्र, त्यांचं राजीनामा देण्याचं तात्कालीन कारण हे बाजार समितीच्या निवडणुका बोलले जात आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे गटाला एकही जागा दिली नव्हती आणि विशेष म्हणजे संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचा प्रचारासाठी वरवंड या ठिकाणी सभा घेतली होती. त्यामुळे पासलकरांच्या नाराजीत अधिकच भर पडली. याबाबत त्यांनी पक्ष नेतृत्वाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या मताकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ठाकरे गटाला खिंडार आणि शिंदे गटाला बळ देण्याचे काम शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजयबापू शिवतरे हे चोख बजावताना दिसत आहे. पासलकर यांचा काल मुंबईत पक्ष प्रवेश झाला त्यावेळीही शिवतारे हे आवर्जून उपस्थित होते. पासलकरांवर शिंदे गटाकडून मोठी जबाबदारी दिली जाईल, असेही मत स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube