महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे ४८ तास शिल्लक राहिलेले (Election) असताना आयाराम गयारामांच्या कोलांटउडीचा वेगही वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना बरेच हादरे दिल्यानंतर खुद्द शिंदेंनाच मोठा झटका बसलाय. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत एकनाथ शिंदे यांचे भाचे आशिष माने यांनी प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भाच्याला राष्ट्रवादीने प्रवेश दिला आहे. तर, दुसरीकडं भाजपच्या माजी मंत्र्यालाही राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडी आणि पक्ष प्रवेशांच्या घडामोडीला वेग आला आहे. आजच मुंबईत वंचित आणि काँग्रसचीही युती झाली आहे. त्यामुळे नक्की कोण कुणासोबत जाणार याची मोठी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे.
मोठी बातमी : मुंबईत काँग्रेस आणि वंचितची आघाडी, कोण किती जागांवर लढणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेहुणीचा मुलगा म्हणजेच त्यांचा भाचा आशिष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांचा प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आशिष माने यांना चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५९ मधून उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आलं आहे.
दुसरीकडं सोलापुरमध्येही शिंदे गटाने भाजपला हादरा दिला आहे. सोलापुरमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती करण्यासाठी चर्चा चालू होती. परंतु आता ऐनवेळी येथे मोठा ट्विस्ट आला आहे. सोलापुरात एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन पक्षांनी युती केली असून भाजपाला धक्का दिला आहे. या नव्या प्रयोगामुळे आता सोलापुरातील विजयाचं गणित बदलणार आहे.
