BMC Election-मुंबईत महायुतीमध्ये 207 जागांवर सहमती, शिवसेनेच्या वाटेला किती जागा ?
BMC Electionमुंबईतील 20 जागांबाबत तिढा सुटलेला नाही. महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढणार आहे हेही निश्चित झाले आहे.
BMC Election: दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिकेची (BMC Election) निवडणुकीमध्ये जोरदार रस्सीखेच असणार आहे. महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे. परंतु दोन्ही बाजूकडून अद्याप जागा वाटप निश्चित होऊन उमेदवाऱ्यांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत. शनिवारी शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) महत्त्वाची बैठक झाली. त्यात 207 जागांबाबत एकमत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण 20 जागांबाबत तिढा सुटलेला नाही. महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढणार आहे हेही निश्चित झाले आहे.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी सोबत येणार असतील तर आम्ही…, काँग्रेस नेते वडेट्टीवारांची मोठी घोषणा
मुंबईतील रंगशारदा नाट्यगृहात भाजप–शिवसेना यांची महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे आशिष शेलार, शिवसेनेचे उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. बैठकीनंतर हे सर्व नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी रवाना झाले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अमित साटम यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, आज भाजप आणि शिवसेनेची संयुक्त बैठक झाली. यामध्ये जनसभा नियोजन, संयुक्त सभा आणि जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली. भाजप 128 तर शिवसेना 79 अशा एकूण 207 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित 20 जागांबाबत चर्चा सुरू असून, राष्ट्रीय पातळीवर चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाईल. (BMC Election-Mumbai Mahayuti agrees on 207 seats, how many seats will Shiv Sena get)
मुंबईतील एका आघाडीमुळे ‘वंचित’ वरील तो डाग पुसला जाणार …पण भाजपला आयतं कोलीत मिळणार
समोरचा उमेदवार कोण? त्यावर उमेदवार ठरणार ?
समोर कोण उमेदवार आहे, हे पाहून काही जागांवर भाजप किंवा शिवसेना लढणार याचा निर्णय घेतला जाईल. मुंबईचा रंग बदलणाऱ्या शक्तींना पराभूत करण्यासाठी महायुती सज्ज आहे. सर्व मित्र पक्षांना समाधानकारक जागा दिल्या जातील, अमित साटम यांनी सांगितले.
कोण किती जागा लढतो हे महत्त्वाचं नाही. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन अंतिम यादी जाहीर केली जाईल. इतर पक्ष काय करतात, त्यावर आमचे निर्णय अवलंबून असतील, यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना साटम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिला जात आहे. आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका करताना ते म्हणाले,“आदित्य ठाकरे हे बालबुद्धीचे आहेत. त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आम्हाला राम शिकवू नये. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संयुक्त सभा लवकरच होणार आहे. 1 किंवा 2 तारखेपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे.
शिवसेना ( शिंदे )माजी खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं की,महायुती कशी जिंकणार याचं नियोजन सुरू आहे. आम्ही उमेदवारांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. गरज पडल्यास उमेदवारांची अदलाबदलही केली जाईल. दोन्ही पक्षांमध्ये सन्मानजनक जागावाटप होईल. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे.
