Download App

खोक्याच्या घरावर बुलडोझर, ‘… तर वन अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाणार’; वनमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं?

Forest Minister Ganesh Naik On Satish Bhosale House : बीडमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसले (Satish Bhosale) याच्या घरावर वनविभागाने कारवाई केली. त्यानंतर मात्र त्याचं पूर्ण कुटुंब उघड्यावर आलं. याच संदर्भात आज सतिश भोसले उर्फ खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक बीडचे (Beed) पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटण्यासाठी काल मुंबईत गेले होते. त्यानंतर आता याप्रकरणी वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी मोठं अपडेट दिलेलं आहे. खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांचे घर वनक्षेत्राच्या बाहेर असताना वन अधिकाऱ्यांनी पाडले असेल, तर त्यांच्या विरोधात कारवाई होईल, असं वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केलंय.

वन अधिकाऱ्यांनी खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांचं घर वनक्षेत्राच्या बाहेर असताना पाडलं असेल, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. मात्र वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून ते राहत असेल, तर वन विभागाची कारवाई योग्यच म्हणावी लागेल. वनक्षेत्राच्या बाहेर जाऊन वनाधिकाऱ्यांनी घर पाडले असतील, तर चौकशी अंती वनाधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असं आश्वासन देखील गणेश नाईक यांनी दिलंय.

‘कर्जत’मधील फोडाफोडी रोहित पवारांच्या जिव्हारी; म्हणाले, “आता तरी राम शिंदेंनी..”

65 टक्के वन विदर्भात असून आणि वनविभागाचे बहुतांशी कार्यालय ही विदर्भात नागपुरात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन सूचना देण्यासाठी आज आणि उद्या वनविभागाच्या महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे. प्रामुख्याने वाघ आणि मानवी संघर्ष संदर्भात तसेच वाघांच्या मृत्यू बद्दल या बैठकीत चर्चा करणार आहोत. वन विभागाचे उत्पन्न वाढावे यासाठी वन विकास महामंडळ, मॅग्रोव्ह डिव्हिसन आणि सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.महाराष्ट्राचा वनक्षेत्र 21% टक्के वरून 30% व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलंय.

आम्ही महायुतीत आहोत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणीही रोखलेला नाही. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना आमदारांना कुठल्याही क्षेत्रात जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्याद्वारे महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न केला, तर त्यात काहीही वावगं नाही, असं देखील त्यांनी म्हटलंय.

संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव…. ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित! चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तर मुनावळे सातारा जिल्ह्यात या जल प्रकल्पाचे काम कोणीही थांबवलेलं नाही. कोणताही प्रकल्प सुरू करताना पर्यावरण विभाग आणि वनविभागाची औपचारिक परवानगी आवश्यक असते. त्या अनुषंगाने दोन्ही खात्यात कागदपत्रांचे आदान प्रदान होईल. कोणताही प्रकल्प अडवण्याचा कारण नाही कोणीही अडवणार नाही. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यात कुठल्याही भागात जनतेसाठी प्रकल्प करण्याचा ठरवलं, तर महायुतीचे सर्व नेते त्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील, असं देखील नाईकांनी स्पष्ट केलंय.

 

follow us