ठाण्यात सर्वात जास्त सिनिअर मंत्री मी; नाईकांच्या वक्तवाने शिंदे-फडणवीसांतील शीतयुद्धाच्या चर्चांना दुजोरा

ठाण्यात सर्वात जास्त सिनिअर मंत्री मी; नाईकांच्या वक्तवाने शिंदे-फडणवीसांतील शीतयुद्धाच्या चर्चांना दुजोरा

Ganesh Naik says I am Senior Minister in Thane : महायुतीची बहुमताने सत्ता आली. त्यानंतर महायुतीचा कारभार गोडी गुलाबीने चालेल, असे जनतेला वाटत होते. पण त्यानंतर तिन्ही पक्षातील नेते अन् विशेषत: एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जास्तच खटके उडू लागले आहेत. शिंदे यांना त्यांच्या ठाणे जिल्ह्यात कसा शह देण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरूय. त्याची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे दिलीय, अशी राजकीय चर्चा सुरू झालीय.त्यातच आता गणेश नाईकांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे की, ठाण्यामध्ये मी सर्वांत वरिष्ठ मंत्री आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेत पुन्हा तूतू मैंमैं पाहायाला मिळणार आहे. तसेच यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चांना दुजोरा देखील मिळत आहे.

काय म्हणाले गणेश नाईक?

भाजपच्या गणेश नाईकांनी आज ठाण्यामध्ये भाषण केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी 1990 ला आमदार झालो. मी सर्वातच जास्त वेळा म्हणजे 4 वेळा मंत्री झालो आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये सर्वात जास्त सिनिअर मंत्री मी आहे. हे केवळ आगरी समाजाने घडवलं नाही. तर सर्वांनी मला निवडलं आहे. तसेच मी कधीच जातीपातीचं राजकारण करत नाही. मात्र मला कुणी जात विचारली तर मी अभिमानाने आगरी असल्याचं सांगतो. असं म्हणत नाईक यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं! सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येकाची आस्था…

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतला होता. मात्र ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे. शिंदे हे ठाणे व मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर गणेश नाईक हे ठाण्याचे संपर्कमंत्री आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये गणेश नाईकांनी लक्ष घातले आहे. त्यांच्या जनता दरबाराला प्रतिसाद मिळाला आहे. यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला आहे.

बीड पुन्हा पेटले! थरकाप उडवणाऱ्या हत्या-आत्महत्यांची मालिका; सुप्रिया सुळे अमित शाहंना भेटणार

तसेच गणेश नाईक हे मूळचे शिवसैनिक आहेत. मात्र राष्ट्रवादीत गेल्यानंतर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष झालेला आहे. भाजपमध्ये आल्यावर गणेश नाईक यांना ताकद मिळाली. ते आता पालघरचे पालकमंत्री आहेत. परंतु पूर्वी त्यांनी दहा वर्षांहून अधिककाळ ठाण्याचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. आगरी समाजाची पार्श्वभूमी असलेल्या नाईक यांना ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यात मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाजपसाठी गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंची कोंडी करणारा हुकमी एक्का आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube