Former BJP MLA R.T. Jija Deshmukh passes away in an accident; Political circles mourn : भाजपाचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे अपघाती निधन झालं आहे ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. लातूर जिल्ह्यातील औसा जवळील बेळकुंड येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लातूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड व लातूर जिल्ह्यांतील राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
‘आता थांबायचं नाय’मुळेच… मराठी सिनेमा चित्रपट गृहात श्वास घेतोय!
प्राथमिक माहितीनुसार, आर.टी. हे औसाकडे प्रवास करत असताना बेळकुंडजवळ त्यांच्या गाडीच्या काचांवर रस्त्यावरील पाणी अचानक आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे वाहनाने तीन ते चार पलटी घेतल्या. गाडी (क्रमांक एमएच ४४ २७९७) अपघातग्रस्त झाल्यामुळे त्यात बसलेले जिजा देशमुख गंभीररित्या जखमी झाले.
Video : पहिल्याच पावसात मुंबईची ‘तुंबई’ होताच शिंदेंनी पावसावरचं फोडलं खापर; ऐका काय म्हणाले…
अपघातानंतर तातडीने त्यांना लातूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एक तळागाळातील समाजाशी नाळ असलेला नेता हरपल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.