‘आता थांबायचं नाय’मुळेच… मराठी सिनेमा चित्रपट गृहात श्वास घेतोय!

Ata Thambaycha Naay Marathi Film In Theatre : कधी कधी सिनेमा केवळ (Marathi Film) बघायचा नसतो, तो मनापासून अनुभवायचा असतो. ‘आता थांबायचं नाय’ पाहिल्यावर ही गोष्ट अगदी ठळकपणे जाणवते. या सिनेमाचं कुठे फारसा ढोलबजाव प्रचार झालेला नाही. पण तरी तो गावागावात (Ata Thambaycha Naay) पोहोचला. कारण लोकांनी तो स्वतः अनुभवला आणि स्वतःचं पुढच्या लोकांना (Entertainment News) सांगितला. कोणी म्हणालं, हा सिनेमा पाहिलाच पाहिजे. ते ऐकून बघणारेही म्हणाले, “हो, खरंच!”
थिएटरमध्ये टाळ्यांचा गजर, शेवटी उभं राहून दिलेला सन्मान, डोळ्यांत पाणी, आणि पुन्हा एकदा पाहायचा निश्चय, हे सगळं फक्त गोष्टीच्या ताकदीमुळे नाही. ‘आता थांबायचं नाय’मध्ये काहीतरी अस्सल आहे. जे थेट काळजाला भिडतं. सिनेमा बोलतो शिक्षणाबद्दल, आत्मभानाबद्दल आणि दुसऱ्या संधीबद्दल. पण मोठमोठ्या डायलॉग्समधून नाही, तो साधेपणाने बोलतो, म्हणून प्रामाणिकपणे भिडतो.
अहिल्यादेवींचं प्रशासन अन् देवाभाऊंची तयारी, अमित शाहांसमोर अशोक चव्हाणांचा विजयी ‘शंखनाद’
झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांच्या संयुक्त निर्मितीत साकारलेला हा सिनेमा आज एका सामाजिक जाणिवेची चळवळ बनत चाललाय. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, पर्ण पेठे, किरण खोजे, प्राजक्ता हणमघर, श्रीकांत यादव, दीपक शिर्के , रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर, या सगळ्यांनी आपापली भूमिका इतक्या सहजतेने साकारल्या आहेत, की कुणीही हिरो वाटत नाही. कारण इथे हिरो आहे ती कथा.
या सिनेमाच्या यशामागे एक ठोस बदल आहे. झी स्टुडिओ मराठीचं नवं नेतृत्व. बवेश जानवलेकर यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ‘आता थांबायचं नाय’ हा त्यांचा पहिलाच सिनेमा. त्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय वेगळे होते, पण नेमके होते. दिग्दर्शक शिवराज वायचळ यांच्यासारख्या नवख्या दिग्दर्शकावर विश्वास ठेवणं, लेखक अरविंद जगताप यांना संकल्पनेत सामील करणं, प्रभावी शीर्षक सुचवणं, अजय गोगावले यांच्याकडून टायटल सॉंग गाणं, आणि गुलराज सिंग यांचं संगीत निवडणं. हे सगळं केवळ यंत्रवत नव्हतं, तर विचारपूर्वक होतं, मनापासून होतं.
भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा; बरगेंच्या सवालानंतर प्रताप सरनाईकांचे निर्देश
आज ‘आता थांबायचं नाय’ सलग चौथ्या आठवड्यात थिएटरमध्ये चालू आहे. अजूनही शो हाउसफुल्ल जातायत. काही ठिकाणी तर स्क्रीन वाढवावी लागली. हे फार कमी मराठी चित्रपटांबाबत घडतं. झी स्टुडिओ मराठीने प्रेक्षकांचा सूर ओळखून घेतलेला निर्णय इथे अचूक ठरतो. म्हणूनच ओटीटीपेक्षा थिएटरला दिलेली ही संधी हा एक यशस्वी प्रयोग ठरतोय. पुढच्यासाठी दिशा देणारी उदाहरणही.
आज झी स्टुडिओ मराठी सिनेमा तयार करताना त्याचं भविष्यसुद्धा तितक्याच काळजीने पाहतोय. थिएटर, टीव्ही आणि ओटीटी या सगळ्या टप्प्यांचा विचार करत, योग्य वेळ आणि योग्य माध्यम निवडतोय. बवेश जानवलेकर यांच्या नेतृत्वाखाली हे चित्रपट केवळ तयार होत नाहीत, तर त्यांना पूर्णपणे श्वास दिला जातोय. हेच मराठी सिनेमाच्या नव्या पर्वाचं लक्षण आहे. शेवटी एवढंच, अजून पहिला नसेल, तर… थांबायचं नाय! हा सिनेमा फक्त पाहण्याचा नाही — तो अनुभवण्याचा आहे. थिएटरमध्ये बसून त्याचा खरा अर्थ उमगतो.
म्हणूनच आज सगळा महाराष्ट्र एकच सांगतोय, ‘हा सिनेमा पाहाच… कारण आता खरंच, थांबायचं नाय!’