अहिल्यादेवींचं प्रशासन अन् देवाभाऊंची तयारी, अमित शाहांसमोर अशोक चव्हाणांचा विजयी ‘शंखनाद’

MP Ashok Chavan In Amit Shah Sabha At Nanded : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नांदेडमधून (Nanded) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंखनाद केलाय. तर आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार तयारी केल्याचं अधोरेखीत करीत त्यांनी अमित शाहांसमोर विजयी शंखनाद देखील केला आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी खासदार अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनी ऑपरेशन सिंदूर राबविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.
दहशतवाद्यांचं बिमोड करणार
यावेळी अशोक चव्हाण जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले की, अकरा वर्ष पूर्ण होत असताना आपल्यांना मोदी साहेबांचं अभिनंदन करायचं आहे, त्यासाठी हा शंखनाद. आगामी काळात आम्हाला देवाभाऊंना शाश्वत करायचं आहे, नांदेड (Local Body Election) म्हणजे केवळ भाजप, असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूर हे फार मोठं धाडसाचं काम होतं. पंतप्रधान मोदींनीच ऑपरेशन सिंदूरचं नामकरण केलं. दहशतवाद्यांचं बिमोड करणार, अशी भूमिका त्यांनी घेतली. अमित शाहांनी नक्षलवाद्यांचा उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी त्यांचे आभार.
भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा; बरगेंच्या सवालानंतर प्रताप सरनाईकांचे निर्देश
अतिशय महत्वाची बाब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे. भाजपाच्या (BJP) वतीने जोरदार सेलीब्रेशन करणार आहे. त्यांनी ज्या पद्धतीने प्रशासन चालवलं, जसे उत्तम निर्णय घेतले, त्याचप्रमाणे देवाभाऊ सुद्धा तयारीला कामाला लागले असल्याचं अशोक चव्हाण यांनी (Amit Shah Sabha At Nanded) म्हटलंय.
मराठवाड्याच्या गरजा फार मर्यादित
मराठवाड्याच्या गरजा फार मर्यादित आहे. आगामी काळात विकसित मराठवाड्याला गुंतवणूक अधिक यावी, रोजगार यावा, लोकांच्या हाताला काम मिळावं. अधिकाधिक गुंतवणूक आपल्या भागाला कशी येईल, याचा विचार करावा अशी विनंती देखील यावेळी अशोक चव्हाण यांनी केलीय. या भागात बुलेट ट्रेन आल्यास मराठवाड्याला भरपूर काही दिल्यासारखं होईल, असंही त्यांनी म्हटलंय.
Mumbai Rain : पहिल्याच पावसात मेट्रो स्टेशन तुंबलं, मेट्रो प्रशासनाची मुजोरी अन् रिपोर्टिंगला मज्जाव
विकासाचा रोडमॅप तयार
देवाभाऊंनी विकासाचा रोडमॅप तयार केलाय. महाराष्ट्रातील अविकसित भागांना न्याय देण्याचं काम सरकार करीत आहे. आगामी काळात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून राहणार, असं आश्वासन देखील भरसभेत अशोक चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शाहांना दिलं आहे. जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आली आहे, याला कारण मोदी साहेबांचा ‘सबका साथ सबका विकास’ हे धोरण आहे. यशस्वीपणे आम्ही भाजपला आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवून द्यावं, असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.