ठाकरे बंधूंचं ठरलं; मनसे आणि शिवसेना ठाकरे गट मुंबईसह ६ महानगरपालिका सोबत लढवणार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिका आणि विविध मुद्द्यांवर चर्चा. राज्यातील 6 महानगरपालिका सोबत लढवण्याचा घेतला निर्णय.
Shivsena UBT And MNS Allience : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यात काल भेट झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Udhhav Thackrey) यांच्यात मुंबई महानगरपालिका आणि विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आणि शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) राज्यातील 6 महानगरपालिका सोबत लढवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई महानगरपालिकेसह (BMC) कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे (PMC) महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेची युती होणार आहे. ठाणे महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जागावाटपाबाबत चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत जागावाटपाची जबाबदारी मनसेकडून राजू पाटील यांना तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार वरुण सरदेसाई यांच्यावर सोपवली आहे.
निवडणुकीत राज्यामध्ये पैशांचा धूर; ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चौफेर फटकेबाजी
जास्त मराठी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्या 20 ते 25 जागांवर नगरसेवक आहेत त्या जागांचीही मागणी मनसेनं केली आहे. त्याचप्रमाणे ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागा देखील मनसेने मागितल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाची ज्या जागांवर ताकद आहे त्याच जागा मनसे मागत असल्यानं ठाकरे गटाची गोची झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र यावर अजून निर्णय झाला नसून, तेथे संबंधित जागांवर कोणाची ताकद जास्त आहे हा विचार करूनच ठाकरे गट या जागा सोडणार आहे. भायखळा, शिवडी, वरळी, दादर, माहीम, भांडुप आणि जोगेश्वरी या मराठी मतदार जास्त असलेल्या प्रभागांसाठी दोघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. कालच्या चर्चेत सोबत लढण्यावर निर्णय झाला असला तरी कोण कोठून लढणार याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
