गुरुजी गेले! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; अवघा महाराष्ट्र शोकाकुल

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे आज (23 फेब्रुवारी) निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. काल (22 फेब्रुवारी) त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून दिली होती. मात्र उपचारादरम्यान, पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत […]

Manohar Joshi

Manohar Joshi

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे आज (23 फेब्रुवारी) निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. काल (22 फेब्रुवारी) त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून दिली होती. मात्र उपचारादरम्यान, पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

कोण आहेत मनोहर जोशी?

मनोहर जोशी यांना बाळासाहेब ठाकरे यांचे सुरुवातीपासूनचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत ते पहिल्यांदा आमदार झाले होते. 1976 ते 1977 या काळात त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले होते. 1955 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत येताच बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविली. त्यानंतर जोशी यांनी केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्याही पार पाडल्या.

मनोहर जोशी यांची वैयक्तिक माहिती :

मनोहर जोशी यांचे मूळ गाव बीडमधील पण त्यांचा जन्म रायगडमध्ये झाला. 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने जोशी मुंबईत आले आणि M.A. L.L.B झाले. या शिक्षणाच्या जोरावर त्यांना मुंबई महापालिकेत नोकरी मिळाली. पण नोकरीत त्यांचे मन लागत नव्हते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात उडी घेतली आणि विद्यार्थ्यांना व्यावयायिक प्रशिक्षण देणाऱ्या कोहिनूर इंस्टिट्यूटची स्थापना केली. यामुळेच त्यांना ‘गुरुजी’ म्हणूनही ओळखले जाते.

Pune Loksabha: उद्योगपती अनिरुद्ध देशपांडे यांचाही उमेदवारीसाठी बड्या नेत्याला फोन

पुढे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले, शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. बाळासाहेबांच्या भाषणांनी आणि विचारांनी भारावून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष अशी एक एक चढत्या क्रमांकाची पद त्यांनी यशस्वीपणे भूषविली. अखेरीस आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Exit mobile version