Pune Loksabha: उद्योगपती अनिरुद्ध देशपांडे यांचाही उमेदवारीसाठी बड्या नेत्याला फोन

  • Written By: Published:
Pune Loksabha: उद्योगपती अनिरुद्ध देशपांडे यांचाही उमेदवारीसाठी बड्या नेत्याला फोन

Loksabha Election : लोकसभा निवडणूक आता काही दिवसांवर आली आहे. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. सध्या पुणे लोकसभा मतदारसंघही (Pune Loksabha) अनेक इच्छूक उमेदवारांमुळे चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून भाजपकडून (Bjp) लढण्यासाठी अनेक जण तयारी करत आहेत. त्यात पुण्यातील मोठे उद्योजक व सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे (Anirudh Deshpande) हेही यांचे नावही चर्चेत आले आहे.

या मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, माजी खासदार संजय काकडे यांच्याबरोबर आता अनिरुद्ध देशपांडे यांचे नावही चर्चेत आले आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी देशपांडे यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत.त्यामुळे त्यांचे समर्थक राजनाथ सिंह यांच्या संपर्कात आहेत.


‘शिरुर’चा दावा आढळराव पाटलांनी सोडला ? राष्ट्रवादी किंवा भाजपला जागा सोडण्यास ‘ग्रीन सिग्नल’

देशपांडे यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत. बांधकाम क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या सिटी कॉर्पोरेशनचे ते प्रमुख आहेत. तर शहरीकरणाचा एक आदर्श नमुना असलेल्या अमनोरा पार्क टाऊन या विशेष प्रकल्पाचे, लवासा प्रकल्पाचे ते प्रमोटर आहेत.

सामाजिक उपक्रमात भरीव योगदान

देशपांडे एक उत्तम बांधकाम व्यावसायिक, कलात्मक दृष्टी असलेले विकसक व पुणे शहराच्या विकासासाठी खास दूरदृष्टीकोन असलेले व्यक्तिमत्व आहे. काही वर्षांपूर्वी देशपांडे यांनी पुण्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केला होता. पुण्यातील प्रसिद्ध पु. लय देशपांडे उद्यान निर्माण करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचे भरीव योगदान राहिले असल्याचे समर्थक सांगत आहेत.

दोन वेळा तयारी पण…
अनिरुद्ध देशपांडे यांनी दोन वेळा भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. 2014 आणि 2019 ला ते लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत होते. परंतु वेगवेगळ्या कारणामुळे त्यांचे तिकीट हुकले आहे. यंदा मात्र ते तिकीट मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे माहिती राजकीय गोटातून मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज