बीड जिल्ह्यातील आष्टी मतदार संघातून ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Election) तोंडावर मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे सहकारीह राहिलेले आणि पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवनात हा प्रवेश झाला. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार बाळासाहेब आजबे उपस्थित होते.
Video: पंकजा मुंडे यांच्या सभांमुळेच माझा पराभव; भीमराव धोंडे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
यावेळी बोलतातना अजित पवार म्हणाले, आम्ही कायम चांगल्या लोकांना साथ दिलेली आहे. त्यामुळे धोंडे साहेब यांनी माझ्यासोबत चार टर्म आमदार म्हणून काम केलेल आहे. त्यामुळे ते काही मला नवीन नाहीत. ते माझे जुने सहकारी आहेत. त्यांचं मी पक्षात स्वागत करतो असं म्हणत त्यांनी धोंडे यांचं पक्षात स्वागत केलं. त्याचबरोबर या तालुक्यात पक्षाचं जोमाने कार्यकर्त्यांनी आता काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
यावेळी भीमराव धोंडे यांनी बोलताना आपण सर्व लोकांसोबत काम केलेलं आहे असं म्हणत, माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासोबतही काम केल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर आम्ही निष्ठेने काम करणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही आता पक्षाच्या वाढीसाठी काम करू असंही ते म्हणाले. तसंच, आम्हाला कॅन्सर रुग्णालयासाठी मदत करावी अशी मागणी धोंडे यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यावर होईल तेव्हडी तुम्हाला आम्ही मदत करु असंही अजित पवार यांनी यावेळी आश्वासन दिलं आहे.
