Laxman Mane on Maratha Morcha : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राजकारण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून (OBC) आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण नको अशी मागणी ओबीसी नेते करत आहे. तर आता मनोज जरांगे पाटील यांनी जात सोडावी आणि आरक्षण घ्यावे असे आव्हान माजी आमदार लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी केले आहे. लेट्सअप मराठीला (Letsupp Marathi) दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना लक्ष्मण माने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ओबीसी आरक्षण मर्यादा वाढवावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे असं म्हटले आहे.
या मुलाखतीमध्ये बोलाताना माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले की, आरक्षण कोणालाही देता येत नाही. आरक्षण कोणाला द्याचे याबाबत भारतीय संविधानमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. संविधानमध्ये देण्यात आलेल्या तरतुदीनुसार आरक्षण मिळाला पाहिजे. आर्थिक गरिबी आणि आर्थिक दारिद्रय वेगळे आहे. सामाजिक गरिबी आणि सामाजिक दारिद्रय वेगळे आहे. ज्या दिवशी लोकशाही भांडवलदारांच्या हातात जाणार त्यादिवशी अर्थव्यवस्था संपणार असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आणि आज देशातून लोकशाही संपली आहे.
आज देखील जातीमुळे माणसांची ओळख आहे. त्यामुळे जे स्वतःला उच्च समजतात त्यांनी आरक्षण मागू नये. त्यांनी सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेमध्ये हिस्सा मागितला पाहिजे. लोकसंख्याच्या प्रमाणात जरांगे पाटील यांच्या हातात मुख्यमंत्रीसह सर्व पद होते आणि उद्याही राहणार आहे. त्यांनी जात सोडावी आणि आरक्षण घ्यावे आम्हाला काही हरकत नाही. पण त्यांना जात न सोडता आरक्षण पाहिजे.
… तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर लाखो लोक उतरणार; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा
शाहू महाराज म्हणत होते तुम्हाला मागासवर्गीयमधून आरक्षण मिळणार पण तेव्हा त्यांनी घेतला नाही. मराठा समाजाला आमचा विरोध नाही. ओबीसी आरक्षण मर्यादा वाढवावी आणि त्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे असं या मुलाखतीमध्ये बोलताना माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले.