माजी खासदार रणजितसिंह थेट आमदार रामराजेंच्या घराबाहेर; फलटणचे राजकारण तापले

Ranjitsinh Naik Nimbalkar : फलटणच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

Ranjitsinh Naik Nimbalkar

Ranjitsinh Naik Nimbalkar

Ranjitsinh Naik Nimbalkar : फलटणच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच रणजितसिंह हे कायम पोलिसांचा फौजफाटा घेऊन फिरतात, हिंमत असेत तर त्यांनी एकट्याने फिरुन दाखवावे असं आव्हान आमदार रामराजे यांनी माजी खासदार रणजितसिंह यांना दिला होता. या आव्हानाला रामराजे यांनी प्रत्युत्तर देत पोलिसांचे संरक्षण न घेता एकटेच काल रात्री गजानन चौकात दाखल झाले होते. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

आमदार रामराजे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार रणजितसिंह (Ranjitsinh Naik Nimbalka) यांना आव्हान दिला होता. या आव्हानानुसार, 19 ऑगस्टच्या रात्री 9.30 च्या सुमारास रणजितसिंह पोलिसांचे संरक्षण न घेता बुलेट वरुन एकटेच गजानन चौकात दाखल झाले होते. माजी खासदार चौकात दाखल होताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती मात्र रणजितसिंह यांनी कार्यकर्त्यांना दूर राहण्याचे आवाहन केले. यानंतर चौकात बुलेटवर फेरफटका मारुन आमदार रामराजे (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानाबाहेर देखील काही काळ थांबले. यानंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की, कोणताही पोलिसांचा फौजफाटा न घेता मी एकटा आलेलो आहे. ज्यांनी ज्यांनी मला आव्हान दिले ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी इथे यायला पाहिजे होते. त्यांना माझ्या पोलिसांच्या प्रोटेक्शनची काय अडचण आहे हे आजपर्यंत मला कळलेले नाही असं माध्यमांशी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले.

युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुरानाची “कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण” कार्यक्रमाला भेट

तर पुढे बोलताना रणजितसिंह म्हणाले की, रामराजेंच्या शिव्यांकडे मी लक्ष देणार नाही पण साखरवाडीत बोलताना त्यांनी मुली – बाळींवर जी घाणेरडी टीका केली ती त्यांची चूक अक्षम्य आहे. त्यांचा सुसंस्कृतपणा कुठे गेला? त्यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांना षंढ म्हटले आणि तरीही ते निमूटपणे ऐकून घेतात त्यांच्या कार्यकर्त्यांनाही काही स्वाभिमान उरलेला नाही असेही यावेळी माजी खासदार रणजितसिंह म्हणाले.

Exit mobile version