Patients Of Guillain Barré Syndrom found in Ahilyanagar : राज्यभरात जीबीएस (GBS) नावाच्या आजाराने थैमान मांडलंय. पुणे शहरात देखील या आजाराचे रूग्ण आढळले होते. त्यानंतर आता अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात देखील जीबीएसने शिरकाव केलाय. यामुळे नगरकरांची डोकेदुखी वाढलं असल्याचं समोर आलंय. गुलीयन बॅरी सिंड्रोम (Guillain Barré Syndrom) (जीबीएस) नावाच्या आजाराचे अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात संशयित चार रुग्ण आढळल्याचे समोर आले होते.
दरम्यान अहिल्यानगरमध्ये आढळलेले हे चौघेही शहराबाहेरील आहेत. यातील एका रुग्णाला संबंधित आजाराचे लक्षणे असल्याच्या संशयाने त्या रुग्णाला पुणे येथे तपासणीसाठी पाठवले आहे. तर तिघांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू (Ahilyanagar News) आहेत. सर्व रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण आणि मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी माध्यमांना माहिती दिली.
PM मोदी अमेरिका दौऱ्यावर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसोबत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची देखील गुलीयन बॅरी सिंड्रोमवर प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, GBS आजाराच्या वाढत्या रुग्ण संखेचा आढावा घेतलाय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून चांगलं समन्वयं ठेवून आजार आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन देखील आबिटकर यांनी केलीय.
राज्यभरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शीघ्र पथक, तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या माध्यमातून उपाययोजना सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांना देखील सविस्तर आढावा घेतला आहे. बाधित झालेल्या रुग्णांना योग्य तो उपचार विनामूल्य दिला जाणार आहे. Sop तयार करण्याचा सूचना देण्यात आल्या आहे. तर आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी म्हटलंय.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून कसे सुटले? लाच देऊन की बादशाहला चकवा देत पराक्रम गाजवून?
पुण्यात जीबीएसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात गुलीयन बॅरी सिंड्रोमचे पाच नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 163 झाली आहे. विभागाच्या अहवालात म्हटलंय की, सर्वाधिक प्रकरणे पुण्यातील आहेत. तर फक्त आठ रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या सामान्य लक्षणांमध्ये हात किंवा पायात अचानक कमजोरी/पक्षाघात यांचा समावेश आहे. यामध्ये चालण्यास त्रास होणे किंवा अचानक अशक्तपणा येणे, अतिसार (सतत काळासाठी) यांचा समावेश आहे.