मोठी बातमी! पुणे शहरात GBS चा पहिला बळी, 56 वर्षीय महिलेचा मृत्यू
Pune GBS Case : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार शहरात जीबीएसमुळे (GBS) पहिला बळी गेला आहे. माहितीनुसार, मृत

Pune GBS Case : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार शहरात जीबीएसमुळे (GBS) पहिला बळी गेला आहे. माहितीनुसार, मृत महिला कॅन्सरग्रस्त होती ससून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होता मात्र आता तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे (Pune) विभागात जीबीएसमुळे हा दुसरा मृत्यू आहे. 29 जानेवारी रोजी पुण्यात नवीन 16 जीबीएस रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यात आता जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 127 पर्यंत गेली आहे. सोलापूरमध्ये देखील एका 40 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराचे रुग्ण पुण्यात वाढत असल्याने पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आजार टाळण्यासाठी काय काय करावे याबाबत देखील पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
आजार टाळण्यासाठी महानगरपालिकेने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी
पाणी उकळून प्यावे
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा.
अन्नपदार्थ हाताळताना प्रत्येक वेळी हात साबणाने स्वच्छ धुवा.
संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या