विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! पुणे विद्यापीठात नवा अभ्यासक्रम, मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! पुणे विद्यापीठात नवा अभ्यासक्रम, मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे

Temple Management Diploma In Savitribai Phule Pune University : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) नवा अभ्यासक्रम आला आहे. विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे मिळणार आहेत. हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (Postgraduate Diploma In Temple Management) सुरू करण्यात येणार आहे.

अधिकारीच निघाले करोडपती; छाप्यात सापडलं मोठं घबाड, नोटा मोजण्यासाठी थेट मशीनच मागवलं

सहा महिने मुदतीच्या या अभ्यासक्रमातून व्यावसायिक पद्धतीने मंदिर व्यवस्थापनासाठीची (Temple Management Diploma) कौशल्ये, मंदिर व्यवस्थापनाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलू या विषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार असून, फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या नाशिक संकुलात, तर पुणे येथे जूनपासून अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यात येणार (Pune News) आहेत. मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने टेम्पल कनेक्ट या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे.

करारावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, टेम्पल कनेक्टचे संस्थापक गीरेश कुलकर्णी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे या वेळी उपस्थित होते. यापूर्वी अशा प्रकारचे करार मुंबई विद्यापीठ आणि वेलिंगकर संस्था यांच्याशी करण्यात आले आहेत. या दोन्ही संस्थांतील अभ्यासक्रम सप्टेंबरपासून सुरू झाले आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत नाशिक संकुलात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

छावा: अतुलनीय शौर्य आणि दृढनिश्चयाचे दर्शन, सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सक्षम मंदिर व्यवस्थापकांची नवी पिढी घडणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाद्वारे महत्त्वपूर्ण परिणाम घडण्याची अपेक्षा आहे. अभ्यासक्रमासाठी राज्यातूनच नाही, तर देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येऊ शकतात, असे डॉ. गोसावी यांनी सांगितले आहे. मंदिर व्यवस्थापन पदविका हे मंदिर व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील पुढील पाऊल आहे, असं कुलकर्णी यांनी नमूद केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube