Hinjewadi IT Park Fraud : हिंजवडी आयटी पार्क येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Hinjewadi) येथे अंदाजे 400 ते 500 आय.टी फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांची फ्लायननोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. उपेश रंजीत पाटील यांनी कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पाटील यांना हिंजवडी पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
उपेश रंजीत पाटील यांनी वेगवेगळ्या कन्सल्टीचे मार्फतीने फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांना मोठ्या वार्षिक पगाराचे अमिष दाखवले. तसेच उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आगऊ रक्कम स्वीकारून त्यांना कामाला लावतो, अस सांगून आणि विश्वास संपादन करून स्वतःच आर्थिक फायदा करून घेतला. सोबतच फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक केली आहे.
भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! पुणे मनपा निवडणुकीसाठी प्रभागरचना ठरली
या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन येथे उपेश रंजीत पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या तरुणांची उपेश पाटील यांच्या प्लायनोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी फसवणूक केले आहे. त्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन आणि फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजशी तातडीने संपर्क साधावा, अस आवाहन फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी केला आहे. फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी केला आहे.
भंडारा – पवनी महामार्गावर भरधाव जाणाऱ्या एका कारंनं दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघं गंभीर जखमी झालेत. ही घटना पवनी महामार्गावरील पालगावं इथं घडली. अपघातानंतर गंभीर दोघांनाही जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रुग्णवाहिका चालकांनं तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. विजय गजभिये (65) आणि बाबुराव कागदे (61) असं अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावं आहेत. सध्या कारधा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.