MPSC Exam 2024 : रविवारी (10 डिसेंबर) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पार पडली. या परीक्षेत आयोगाकडून (MPSC) विचारण्यात आलेल्या दोन प्रश्नाची सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरू आहे. या परीक्षेत तुमचे मित्र तुम्हाला मद्यपान करण्यास प्रभावित करत असतील तर तुम्ही काय कराल आणि तुम्हाला मूतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले तर काय कराल? असे अजब प्रश्न विचारल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चां उधाण आले आहे. मात्र आतापर्यंत आयोगाकडून या प्रश्नांवर आयोगाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
नेमकं काय होते प्रश्न –
तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल?
उत्तराचे पर्याय
1) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
2) दारू पिण्यास नकार देईन.
3 ) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन.
4 ) नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे.
2) दुषित पाणी प्यायल्यामुळे मूत्रपिंडाच्या त्रासाला सामोरे जावे लागल्यास आणि पाण्याचा अभ्यास करूनही स्वतःलाच हा आजार झाल्यास काय कराल?
उत्तराचे पर्याय
1) स्वतःच्या कुटुंबाला खात्रीने पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल अशा ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर करण्याचा विचार कराल.
2) पिण्यायोग्य पाण्याच्या नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या संवर्धनासंबंधीचा स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मुतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल.
3) परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोतांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमांत स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार कराल.
4) पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत लोक उदासीन आहेत हे तथ्य माहित असल्यामुळे कोणत्याही रचनात्मक कार्यासाठी पुढाकार घेणे निरुपयोगी आहे हे लक्षात घेऊन स्वस्थ राहाल.
Prakash Ambedkar : EVM हटाव, वंचितकडून स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात
या परीक्षेमार्फत अधिकारी निवडले जाणार असल्याचे अशा प्रश्नांती गरज आहे का? असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जात आहे. याच बरोबर अनेकजण आयोगाच्या कार्यपध्दतीवर देखील टिका करत आहे.