Pune : MPSC परीक्षा पुढे ढकलली तरीही आंदोलन; पोलिसांकडून धरपकड सुरु

Pune : MPSC परीक्षा पुढे ढकलली तरीही आंदोलन; पोलिसांकडून धरपकड सुरु

MPSC Students Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात एमपीएससीकडून निर्णय घेण्यात आल्यानंतरही विद्यार्थ्यांकडून (MPSC Students Protest) विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरुच ठेवण्यात आलंय. यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु झाल्याची माहिती समोर आलीयं. परीक्षा पुढे ढकल्यानंतर आता या परीक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Emergency: रिलीजपूर्वीच वादात अडकला कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’; ‘या’ कारणामुळे होतोय विरोध

राज्यसेवा आणि आयबीपीएस या परीक्षांची तारीख एकाच दिवशी आल्याने ही तारीख बदलावी यासाठी विद्यार्थ्यांचे दोन दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू करण्यात आलं. आता या आंदोलनाला अखेर यश आले असून, MPSC तर्फे 25 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आज आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोकडून हा निर्णय घेण्यात आल्यानंतरही कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे.

बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदे गतीमंद? तीन लग्न झालीत का?; आई-वडिलांच्या दाव्याने नवा ट्विस्ट

एकीकडे 25 ऑगस्ट रोजी होणारी MPSC ची परीक्षा जरी पुढे ढकलण्यात आली असली त्यानंतरदेखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा देखील समावेश करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं विद्यार्थ्यांनी जाहीर केलं आहे.

आयोगाने परीक्षा पुढे ढकलली पण ही किती दिवस पुढे ढकलली हे सांगितलं पाहिजे. कृषी सेवा परीक्षेसंदर्भात कोणता निर्णय घेतला जाणार आहे यासंदर्भात आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. सरकारने यासंदर्भात स्पष्ट करावं, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube