श्री राघवेश्वर पुरातन महादेव मंदिराला मिळणार नवी झळाळी; आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून 1.50 कोटींचा निधी मंजूर

श्री राघवेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून राज्य संरक्षित स्मारक जतन दुरुस्ती अंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर.

Untitled Design (97)

Untitled Design (97)

Funds of Rs 1.50 crores approved by efforts of MLA Ashutosh Kale : कोपरगाव तालुक्यातील पौराणिक, ऐतिहासिक असलेल्या तसेच कुंभारी व पंचक्रोशीतील भाविकांचे अखंड श्रद्धास्थान असलेल्या श्री राघवेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी महायुती शासनाकडून(State Government) पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, राज्य संरक्षित स्मारक जतन दुरुस्ती अंतर्गत मिळालेल्या दीड कोटी रुपयांच्या निधीतून विकास कामे सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शिवभक्तांच्या सोयी सुविधेत वाढ होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे(MLA Ashutosh Kale) यांनी दिली.

कोपरगाव मतदार संघातील कुंभारी येथील गोदावरी नदीच्या काठावर असलेले श्री राघवेश्वर महादेव देवस्थान असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला याठिकाणी शिवभक्तांची मोठी गर्दी असते. वर्षभर शिवभक्त दर्शनासाठी येत असतात. भाविकांना याठिकाणी चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी श्री राघवेश्वर महादेव देवस्थानच्या विकासकामांसाठी निधी मिळावा याबाबत आमदार आशुतोष काळे यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, राज्य संरक्षित स्मारक जतन दुरुस्ती अंतर्गत 1.50 कोटीचा निधी मंजूर केला होता. जवळपास 100 वर्ष जुन्या असलेल्या या श्री राघवेश्वर महादेव देवस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा निधी या देवस्थानाच्या विकासासाठी मिळवण्यात आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यामुळे निश्चितपणे भविकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये वाढ होणार असून शिवभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; मायक्रोसॉफ्ट देणार 45 हजार रोजगार

या निधीतून मंदिराच्या चोहोबाजूने सरंक्षक भीत बांधणे, पेव्हर ब्लॉक बसविणे व मंदिर परिसर सुशोभिकरण होणार आहे. त्यामुळे देवालयाचा संपूर्ण परिसर अधिकच सुंदर होणार असून येणाऱ्या शिवभक्तांना त्याचा फायदा होणार आहे. श्री राघवेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी महायुती शासनाने 1.50 कोटींचा निधी दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.

Exit mobile version