मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; मायक्रोसॉफ्ट देणार 45 हजार रोजगार
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईमध्ये मिटिंग. मायक्रोसॉफकडून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक.
Devendra Fadnavis Microsoft Ceo Satya Nadella Meet : नागपूरमध्ये विधानसभेच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Cm Devendra Fadanvis) हे एका महत्वाच्या मिटिंगसाठी मुंबईला(Mumbai) गेले होते. मायक्रोसॉफ्टचे(Microsoft) सीईओ सत्या नडेला(Satya Nadela) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईमध्ये मिटिंग झाली आहे. मायक्रोसॉफकडून महाराष्ट्रात(Maharashtra) मोठी गुंतवणूक(Investment) करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची सत्या नडेला यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आजच्या या राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या बैठकीसाठी मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनाला दांडी मारून तातडीने मुंबईला पोहोचले.
🔸 CM Devendra Fadnavis at the ‘Microsoft AI Tour, Mumbai’ programme, where a keynote was presented by Satya Nadella, Chairman and CEO Microsoft.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मायक्रोसॉफ्ट एआय टूर, मुंबई’ या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, जेथे मायक्रोसॉफ्टचे मुख्य… pic.twitter.com/o8K1whAV9b
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 12, 2025
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्याशी झालेल्या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली. याबाबतची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. मायक्रोसॉफ्टसोबत Global Capability Centers हा महत्वकांक्षी प्रकल्प करण्याचा प्रयंत्न असल्याचं देखिल्यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आलं. तब्बल 20 लाख स्क्वेअर फुटांची GCC महाराष्ट्रात उभारण्यात येणार असल्याचं देखील त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आलं.
गिरीश महाजनांना मस्ती, त्यांना राजकारणातून फेकून द्या; वृक्षतोड प्रकरणात अंजली दमानिया भडकल्या
या GCC द्वारे तब्बल 45 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार लवकरच करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्राला एआय हब करण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक आहे. बैठकीत प्राईम एआय ओएस ची चित्रफीत दाखवली. त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात देखील एआयचा वापर कसा करता येईल त्यासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली.
मायक्रोसॉफ्ट भारतात तब्बल 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकन टेक कंपनीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. या निधीचा वापर AI, क्लाउड आणि डेटा सेंटर यांसारख्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केला जाईल. भारताच्या स्वप्नाला पाठिंबा देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट 1.57 लाख कोटी गुंतवत आहे. ही आशियातील आमची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यामुळे भारतात AI साठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण होतील, लाखो लोकांना नवीन कौशल्ये शिकवली जातील आणि आपला डेटा आपल्याकडे सुरक्षित ठेवण्याची ताकदही मिळेल. भारताच्या AI-युक्त भविष्यासाठी हेच हवे होते, असं सत्या नडेला यांनी सांगितले.
