Download App

NCP on Nilesh Rane : ‘किंमत नसलेले नाणे….’, ‘…स्वाभिमान ठेवला भाजपच्या दारी’; राष्ट्रवादीकडून राणेंना डिवचणाऱ्या घोषणा…

NCP on Nilesh Rane : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते. असं वक्तव्य केलं होत. त्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी खळबळजनक ट्विट केले. राणे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार.’ असं खळबळजनक वक्तव्य राणेंनी केलं. त्यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्याविरोधात आज (9 जून) मुंबई येथे निदर्शने केली. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. ( Funny slogan in NCP Demonstrations Against Nilesh Rane for criticize Sharad Pawar)

Sharad Pawar यांना धमकी देणारा नक्की कोण? ट्विटरच्या बायोमध्ये धक्कादायक माहिती…

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी या निदर्शनांच्या फलकांवर निलेश राणेयांच्यावर टीका करणाऱ्या काही मजेशीर घोषणा लिहिलेल्या होत्या. त्यामध्ये ‘किंमत नसलेले नाणे, निलेश राणे’, ‘निलेश राणे दिवसा-ढवळ्या शुद्धीत राहणे’, ‘दिवस-रात्र नशेच्या आहारी स्वाभिमान ठेवला भाजपच्या दारी’ अशा मजेशीर घोषणांसह मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्या निलेश राणे निदर्शने केले.

काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांवर आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले की, देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधान आले. त्यानंतर त्यांना यावर प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.

Sharad Pawar : शरद पवारांनी संभाजीनगर असा उल्लेख केला तरी भाजपने फेक ट्विट केलं

पवार म्हणाले की, मी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते. असं म्हणालो कारण की, ओडीशा आणि इतर काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले झाले आहेत. ख्रिश्चन समाज शांतताप्रिय आहे. एखाद्याची चूक झाली असेल तर कारवाई करा धर्मिक स्थळांवर हल्ले का कारायचे? असा सवाल देखील शरद पवारांनी केला. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील हिंदू मुस्लिम वादावर देखील म्हटले होते की, जे घडतय ते सहजासहजी घडत नाही. त्यामागे एकट्यादुकटयाचा हात नाही त्यामागे एक विचारधारा आहे. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही. असं मत पवारांनी व्यक्त केलं होतं.

काय म्हणाले निलेश राणे?

निलेश राणे यांनी आपल्या या ट्विटमध्ये शरद पवारांनी केलेल्या देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते या बातमीचा संदर्भ दिला आहे. तसेच त्यांनी लिहिले आहे की, ‘निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार.’

Tags

follow us