Sharad Pawar : “औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार” : निलेश राणेंच्या ट्विटने फुटले नव्या वादाला तोंड

Sharad Pawar : “औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार” : निलेश राणेंच्या ट्विटने फुटले नव्या वादाला तोंड

Nilesh Rane on Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांवर आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले की, देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधान आले आहे. त्यानंतर त्यांना यावर प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.( Sharad Pawar is reincarnation of Aurangzeb Nilesh Rane starts controversy )

‘पवार साहेबांचे डायलॉग सेम, त्यांची स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत’; फडणवीसांचा खोचक टोला

पवार म्हणाले की, मी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते. असं म्हणालो कारण की, ओडीशा आणि इतर काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले झाले आहेत. ख्रिश्चन समाज शांतताप्रिय आहे. एखाद्याची चूक झाली असेल तर कारवाई करा धर्मिक स्थळांवर हल्ले का कारायचे? असा सवाल देखील शरद पवारांनी केला. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील हिंदू मुस्लिम वादावर देखील म्हटले होते की, जे घडतय ते सहजासहजी घडत नाही. त्यामागे एकट्यादुकटयाचा हात नाही त्यामागे एक विचारधारा आहे. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही. असं मत पवारांनी व्यक्त केलं होतं.

शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता माजी खासदार निलेश राणे यांनी खळबळजनक ट्विट केले आहे. राणेंच्या या ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे. एवढ नक्की. निलेश राणे यांनी आपल्या या ट्विटमध्ये शरद पवारांनी केलेल्या देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते या बातमीचा संदर्भ दिला आहे. तसेच त्यांनी लिहिले आहे की, ‘निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार.’ त्यामुळे आता या ट्विटमुळे काय-काय वाद निर्माण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

..तर मोदीही राहिले असते मागे; पवारांनी सांगितलं उपराष्ट्रपतींना डावलण्याचं राजकारण

दरम्यान सोमवारी अहमदनगरमधील मुकुंदनगर भागातील संदल उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शिवराज्याभिषेक दिनी समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहर बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र या बंदला बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube