Gadchiroli Accident Six Youths Crushed By Truck : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काटली गावाजवळ गुरुवारी (8 जुलै) सकाळी भीषण अपघात (Accident) घडला. रस्त्यावर व्यायाम करत असलेल्या सहा तरुणांना भरधाव ट्रकने चिरडले. या धक्कादायक घटनेत चौघा तरुणांचा मृत्यू झाला असून, दोन गंभीर जखमींवर नागपूर येथे (Youths Crushed By Truck) उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे संपूर्ण गावातून संताप व्यक्त होत आहे.
रस्त्यावर व्यायाम करत असताना ट्रकची धडक
सकाळच्या सुमारास काटली गावातील सहा युवक रस्त्यावर व्यायाम करत होते. याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना (Gadchiroli Accident) गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. उर्वरित दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ नागपूरला हलवण्यात आले.
परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत, एकनाथ शिंदेंची तंबी; शिवसेनेत नेमकं काय घडतंय
गावात संताप, रस्त्यावर चक्काजाम
या घटनेनंतर संपूर्ण काटली गावात शोककळा पसरली आहे. संतप्त ग्रामस्थांनी गडचिरोली-नागपूर महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ट्रकचालक फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 7, 2025
ट्रम्पला सुट्टी नाही! शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार, PM मोदींचा इशारा
सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा
या अपघाताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटलंय, गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
पोलीस तपास सुरू
मुख्यमंत्र्यांनी यावेळी जखमी युवकांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचंही स्पष्ट केलं. नागपूर येथे पुढील उपचारासाठी दोघांना हेलिकॉप्टरद्वारे हलवण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघातग्रस्त ट्रकचा तपास सुरू आहे. जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक आणि चालकाचा शोध घेतला जात आहे.