ट्रम्पला सुट्टी नाही! शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार, PM मोदींचा इशारा

PM Modi Message To Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताविरुद्ध टॅरिफयुद्ध (Tarriff) सुरू केलंय. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) जोरदार संदेश देत भारत आपल्या शेतकरी आणि मच्छिमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, यावर भर दिला. पंतप्रधान म्हणाले की. त्यांना “किंमत चुकवावी लागेल” हे माहित असले तरी, ते शेतकऱ्यांसाठी ते करण्यास तयार आहेत.
दिल्ली येथे एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. मला माहित आहे की मला वैयक्तिकरित्या याची मोठी किंमत मोजावी लागेल, परंतु मी तयार आहे. देशाच्या शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या हितासाठी भारत तयार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारत तडजोड करणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की, आपल्या शेतकऱ्यांचे कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा संबंध ट्रम्प यांच्या दुप्पट शुल्काच्या घोषणेशी जोडला जात आहे. आजपासून म्हणजेच 7 ऑगस्टपासून भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवर 25% शुल्क आकारले जाईल. 25% अतिरिक्त शुल्क 27 ऑगस्टपासून लागू होईल. यामुळे अमेरिकन बाजारपेठेत भारतीय वस्तू महाग होतील. त्यांची मागणी कमी होऊ शकते. तेथील आयातदार इतर देशांमधून वस्तू मागवू शकतात.
परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत, एकनाथ शिंदेंची तंबी; शिवसेनेत नेमकं काय घडतंय
मोदी म्हणाले की, स्वामिनाथन यांनी देशाच्या अन्न सुरक्षेला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. गुरुवारी दिल्लीत झालेल्या एमएस स्वामिनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी झाले. मोदी म्हणाले, काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत, ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते किंवा कोणत्याही एका क्षेत्रापुरते मर्यादित नाही. प्रो. एमएस स्वामिनाथन हे असेच एक महान शास्त्रज्ञ होते. त्यांनी विज्ञानाला सार्वजनिक सेवेचे माध्यम बनवले.
दुष्काळ आणि चक्रीवादळांमुळे
स्वामीनाथन यांनी देशाच्या अन्न सुरक्षेला त्यांच्या जीवनाचे ध्येय बनवले. त्यांनी एक अशी जाणीव जागृत केली जी येणाऱ्या शतकानुशतके भारताच्या धोरणांना आणि प्राधान्यांना मार्गदर्शन करत राहील. मी अनेक वर्षांपासून स्वामीनाथनशी जोडलेलो होतो. पंतप्रधान पुढे म्हणाले, स्वामीनाथनशी माझे अनेक वर्षांचे नाते आहे. गुजरातच्या जुन्या परिस्थितीशी अनेक लोक परिचित आहेत. पूर्वी दुष्काळ आणि चक्रीवादळांमुळे शेतीला खूप संकटांना तोंड द्यावे लागत होते. कच्छमध्ये वाळवंटाचा विस्तार होत होता. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना, आम्ही मृदा आरोग्य कार्डवर काम सुरू केले. प्रो. स्वामीनाथन यांनी त्यात खूप रस दाखवला, त्यांनी आम्हाला मोकळेपणाने सूचना दिल्या आणि मार्गदर्शन केले. त्यांच्या योगदानामुळे, हा उपक्रम खूप यशस्वी झाला, असं देखील मोदी यांनी स्पष्ट केलंय.