नवी दिल्ली : आधी विधी मंडळातील शिवसेनेचं कार्यालय, नंतर संसदेतील शिवेसना कार्यालयातील ठाकरे पिता-पुत्रांचे फोटो बाहेर काढले आणि आता संसदीय गटनेते पदावरही शिंदे गटाकडून दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे. सध्या संसदीय गटनेतेपदी ठाकरे गटाचे संजय राऊत आहेत. आता संजय राऊत यांच्याजागी शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी दिली आहे.
खासदार राहुल शेवाळे म्हणाले, संसदीय गटनेता ठरवण्याचा पूर्ण अधिकार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. आम्ही शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांना संसदेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यासाठीचं पत्र संसदीय कार्यमंत्र्यांकडे दिल्याचं शेवाळेंनी स्पष्ट केलंय.
निवडणुकीत घडलेल्या घडामोडींवर सत्यजित तांबेंनी केला खुलासा…#SatyajeetTambe #Congresshttps://t.co/JqVYbiMpwp
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 1, 2023
यासंदर्भातील निर्णय शिंदे गटाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत बैठक घेऊन घेतला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. एकीकडे शिंदे गटाकडून विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे शिवसेनेचे प्रतोदपदासाठी शिफारस केलीय. त्यानंतर आता लगेचच संसदेत गटनेतेपदासाठी हालचाली सुरु केल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Ajit Pawar शिंदे-फडणवीस सरकारमुळे मराठीभाषकांवर अन्याय!
दरम्यान, संसदीय गटनेतेपदाच्या हालचालींवरुन ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. देसाई म्हणाले, परवादिवशीच सर्वोच्च न्यायालयाने एसएलपीवर निर्णय दिलेला आहे. अशा प्रकारच्या कृती शिंदे गटाकडून घडत असतील तर त्या न्यायालयाच्या निर्णयविरोधात असतील, असं मत देसाईंनी व्यक्त केलंय. तसेच तसे झाल्यास आम्ही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचा इशाराही अनिल देसाईंनी दिला आहे.
Ajit Pawar म्हणाले… दळभद्री गाडीवर प्रसिध्दीसाठी सरकारने ५० कोटींचा चुराडा केला
संसदीय गटनेते पदावरुन उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय खासदार संजय राऊत यांची उचबांगडी करण्यात येणार आहे. राऊत यांच्याऐवजी खासदार गजाजन किर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. संसदीय गटनेता ठरवण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री शिंदे यांना असल्याचं राहुल शेवाळेंनी स्पष्ट केलंय.