Download App

धनंजय मुंडेंचे मेव्हुणे मधुसूदन केंद्रेंचा भाजप आमदाराला धक्का; 18 पैकी 11 जागा राष्ट्रावादीच्या ताब्यात

APMC Election 2023 :  गंगाखेड बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी 18 पैकी 11 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वातील सर्व पॅनेलने जिंकल्या आहेत. या निकालामुळे भाजपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मोठा धक्का बसला आहे.

मधुसूदन केंद्रे हे  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  व माजी मंत्री  धनंजय मुंडे यांचे मेव्हणे  आहेत. केंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने जिंकल्या 18 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

त्यामुळे आज मतदार कोणाला कौल मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यातील 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. त्याच बरोबर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतमोजणी होत आहे.

पारनेरमध्ये Sujay Vikhe गटाचा धुव्वा, लंके-औटी गटाने सर्व जागा जिंकल्या

 

Tags

follow us