Gautami Patil आली अन् नाचून गेली; पोलिसांनी दिला दणका…

 अहमदनगर : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil ) कार्यक्रम म्हटलं की गोंधळ, राडा हा ऐकायला मिळतोच. काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या डीजे शोचा राज्यभर धमाका सुरुच आहे. आपल्या अदाकारीने तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम गौतमीला महागात पडला आहे. पोलिस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली तरीदेखील कार्यक्रम केला […]

Gautami Patil News

Gautami Patil News

 अहमदनगर : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil ) कार्यक्रम म्हटलं की गोंधळ, राडा हा ऐकायला मिळतोच. काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या डीजे शोचा राज्यभर धमाका सुरुच आहे. आपल्या अदाकारीने तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम गौतमीला महागात पडला आहे. पोलिस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली तरीदेखील कार्यक्रम केला असल्याने गौतमी पाटीलसह अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Photos : केकनंतर राहुल गांधींनी बनवले फर्निचर; फर्निचर मार्केटला भेट देत कामगारांना मदत

अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये काल गणपती विसर्जनानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं गणेश मंडळाने ठरवलं. त्यानूसार मंडळाकडून संपूर्ण तयारीही करण्यात आली. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तोफखाना पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती.

दगडूशेठ मंडळाने जिंकली लाखो भाविकांची मने; मात्र, अन्य मंडळांमुळे पुण्यातील विसर्जन मिरणूक रेंगाळली

मात्र, पोलिस प्रशानाचा आदेश झुगारुन गौतमी पाटीलचा दणक्यात कार्यक्रम पार पडला. सावेडीमधील गुलमोहोर रोड चौकातील एकदंत मित्र मंडळाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गणेश विसर्जनाच्या दिवशीच रस्त्याच्या मधोमध मोठा स्टेज उभा करण्यात आला होता. या स्टेजमुळे रस्त्यातील वाहतुकीस मोठा अडथळाही निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. एकीकडे पोलिसांनी परवानगी नाकरली तर दुसरीकडे कार्यक्रम पार पडला. या प्रकारामुळे पोलिसांनी गौतमी पाटील, अशोक खरात, राहुल सांगळे, आनंद नाकाडे आणि हर्षल भागवत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर : उत्तरेवर भाजपचा दावा, राजेश क्षीरसागरांची दक्षिणेत चाचपणी; दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहणार?

विसर्जन मिरवणूक काळातील जे काही नियम व अटी पोलिस प्रशासनाकडून दिल्या होत्या. या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गौतमी पाटील आणि आयोजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कलम 188, 283 अन्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या राज्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ राडा घातल्याचे अनेक प्रकार समोर आल्याने पोलिस प्रशासनाकडून गणशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारल्याचं पाहायला मिळालं होतं. कोल्हापुरातही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांमध्ये भांडणे, खुर्च्या फेकणे, दगडफेकीचे प्रकार घडल्याने तिच्या कार्यक्रमांना प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. कोल्हापुरनंतर आता अहमदनगरमध्येही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी परवानगी नाकारण्यात आल्याने आगामी काळात गौतमीचा कार्यक्रम होणार की नाही? याबाबत शंका निर्माण होतं आहे.

Exit mobile version