Photos : केकनंतर राहुल गांधी यांनी बनवले फर्निचर

भारत जोडो यात्रेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचं राजकीय व्यक्तिमत्त्व प्रचंड बदलल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे. याची प्रचिती येत आहे ती ते विविध ठिकाणांना भेटी देत आहेत त्यातून येत आहे.

या अगोदर राहुल यांनी बाईकवर थेट लडाख गाठलं होतं. तर दिल्लीतील मस्जिदीला भेट देत त्यांनी लोकांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोहब्बत की, दुकान म्हणत स्ट्रीट फूड देखील चाखलं होतं.

यावेळी त्यांनी थेट दिल्लीतील कीर्तिनगरमधील फर्निचर मार्केटला भेट दिली. हे मार्केट अशिया खंडातील सर्वात मोठं फर्निचर मार्केट आहे.

राहुल गांधी यांनी यावेळी या फर्निचर बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या.

त्याचबरोबर यावेळी त्यांनी या फर्निचर बनवणाऱ्या कामगारांना फर्निचर बनवण्यासाठी मदत देखील केली.

हे फोटो कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या फोटोंना कॅप्शन देताना ते म्हटले की, हे फर्निचर बनवणारे लोक मेहनती आणि कलाकार आहेत. ते लाकडांना तासन्यात कुशल आहेत. त्यांच्याशी खास गप्पा झाल्या.

त्यावेळी मी या कलाकारांकडून फर्निचर बनवण्याचं देखील शिकण्याचा प्रयत्न केला.

राहुल जेव्हा या मार्केटमध्ये आले त्यावेळी लोकांनी त्यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
