प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आणि छोटा पुढारी घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) यांचा सामना येत्या 9 जूनला होणार आहे. येत्या 9 जून रोजी गौतमी पाटील अन् छोटा पुढारी फेस-टू-फेसस बसून लावणीवर चर्चा करणार आहेत. दरम्यान, गौतमीच्या लावणीवर आक्षेप नोंदवत छोट्या पुढारीने आपण गौतमीला 9 जूनला भेटूनच समजावणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता गौतमीनेही भेटीला होकार दर्शवला आहे.
‘नगरच्या नामांतराचे स्वागतच पण, महाराष्ट्र सदनातून’.. अजित पवारांनी राज्य सरकारला सुनावलं
काही दिवसांपासून गौतमी पाटील सारखी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. आधी तिच्या नृत्यावर बोट ठेवून अनेकांनी टीका केली. त्यावर गौतमीने माफीही मागितली. त्यानंतर कार्यक्रमात गोंधळामुळे ती चर्चेच होती. आता आडनावाच्या मुद्द्यावरुन चर्चेत आहे. गौतमी पाटीला एका संघटनेने पाटील नाव लावू नये, असा इशारा दिला होता. त्यावर गौतमीनेही सडेतोड उत्तर देत पाटील आहे तर पाटीलच नाव लावणार असल्याचं ठणकावलं होतं.
PHOTO : रकुल प्रिंटेड जंपसूट घालून समुद्रकिनाऱ्यावर निवांत क्षण घालवताना दिसली
आता तिच्या लावणीच्या नृत्यावर बोट ठेवत छोट्या पुढाऱ्याने गौतमी पाटीलवर रोख धरला. गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल, या शब्दांत छोट्या पुढाऱ्याने इशारा दिला होता. त्यानंतर आता गौतमी पाटील ऐकत नसेल तर तिला भेटूनच समजावून सांगणार असल्याचं म्हटलं.
PHOTO : अभिनयाशिवाय बी-टाऊनचे हे स्टार्स या साईड बिझनेसमधून मोठी कमाई करतात
तसेच गौतमी पाटील यांच्या पाटील या आडनावाला आपला विरोध नाही. आडनाव काय लावायचे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेने हा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. म्हणून गौतमींच्या नावाला माझा विरोध नाही तर त्यांच्या अदांना माझा विरोध आहे, असं घनश्याम दरोडे यांनी म्हटले आहे.
छोट्या पुढाऱ्याच्या या वक्तव्यानंतर गौतमीनेही आपली भूमिका स्पष्ट करत प्रत्यक्ष आपण भेटून लावणी विषयावर चर्चा करु, असं सांगितलंय. त्यामुळे आता येत्या 9 जून रोजी गौतमी पाटील अन् घनश्याम दराडे यांची भेट होणार आहे. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होणार? घनश्याम दराडे गौतमीला लावणीबद्दल काय सांगणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.